Martin Guptill Dainik Gomantak
क्रीडा

Martin Guptill: मार्टिन गुप्टिलने हिट मॅन ला दिली टक्कर, विश्वविक्रमाला घातली गवसणी

New Zealand Team: पुन्हा एकदा रोहित शर्माचा विश्वविक्रम मार्टिन गुप्टिलने मोडीत काढला आहे.

दैनिक गोमन्तक

Martin Guptill: न्यूझीलंडचा विस्फोटक सलामीवीर मार्टिन गुप्टिल आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक प्रकारचे युध्द सुरु झाले आहे. मार्टिनने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशीच एक विस्मयकारी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा रोहित शर्माचा विश्वविक्रम मार्टिन गुप्टिलने मोडीत काढला आहे.

दरम्यान, भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता, परंतु आता किवी सलामीवीर मार्टिन गप्टिलने ही कामगिरी आपल्या नावावर केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात गुप्टिलने ही कामगिरी आपल्या नावावर केली आहे. विशेष म्हणजे, याच T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.

दुसरीकडे, रोहित शर्मा हा विश्वविक्रम पुन्हा एकदा आपल्या नावावर करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. रोहित आशिया चषक 2022 मध्ये 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. तो 11 धावा करुन गुप्टिलला मागे सोडू शकतो. जर रोहितने 13 धावा केल्या तर तो 3500 T20 धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल.

तसेच, मार्टिन गुप्टिल सध्या 3497 धावांसह T20 क्रिकेटमध्ये अव्वल आहे, तर रोहित 3487 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली (Virat Kohli) आहे, ज्याने 3308 धावा केल्या आहेत. यावर्षी विराटने अनेक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने गमावले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT