Rohit Sharma & Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाची लॉटरी, विराट-रोहितचा सर्वात मोठा शत्रू जखमी

IND vs ENG T20 World Cup 2022: टीम इंडिया 10 नोव्हेंबरला अ‍ॅडलेडच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल सामना खेळणार आहे.

दैनिक गोमन्तक

IND vs ENG T20 World Cup 2022: टीम इंडिया 10 नोव्हेंबर रोजी अ‍ॅडलेडच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा आणखी एक खेळाडू जखमी झाला आहे. या टूर्नामेंटमध्ये हा खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये होता, तर विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी मोठा धोकादायक ठरु शकत होता.

इंग्लंडचा हा खेळाडू जखमी झाला

इंग्लिश संघाचा स्टार फलंदाज डेव्हिड मलान आधीच दुखापतीने त्रस्त आहे, आता इंग्लंडचा (England) वेगवान गोलंदाज मार्क वुडही (Mark Wood) दुखापतीने त्रस्त असल्याची बातमी समोर येत आहे. अहवालानुसार, भारताविरुद्धच्या (India) उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी त्याने सराव सत्रातही भाग घेतला नाही. मार्क वुडने या स्पर्धेत आतापर्यंत 4 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत.

स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू टाकला

2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत मार्क वुड हा सर्वात वेगवान गोलंदाज आहे. T20 विश्वचषक 2022 मध्ये मार्क वुडने 154.74kph वेगाने सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे. नुकतेच मार्क वुडच्या उजव्या कोपरावरही दोन ऑपरेशन झाले होते, ज्यामुळे तो बराच काळ संघाबाहेर होता.

या खेळाडूच्या दुखापतीमुळे तणावही वाढला

या स्पर्धेदरम्यान इंग्लिश संघाचा स्टार फलंदाज डेव्हिड मलान श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. डेली मेलच्या वृत्तानुसार, डेव्हिड मलान दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. क्षेत्ररक्षणादरम्यान डेव्हिड मलानला दुखापत झाली होती, त्यामुळे तो फलंदाजीलाही उतरु शकला नाही.

T20 विश्वचषकासाठी इंग्लंड संघ

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, अ‍ॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रुक, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.

स्टँडबाय खेळाडू - टायमल मिल्स, लियाम डॉसन आणि रिचर्ड ग्लेसन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

Vande Mataram 150th Anniversary: ‘विकसित भारत 2047 ’च्या स्वप्नासाठी जगा', CM सावंतांचे तरुणांना आवाहन; ‘वंदे मातरम्’ स्मरणोत्सव साजरा

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT