India vs Australia | Ruturaj Gaikwad Run Out Screengrab: bcci.tv
क्रीडा

IND vs AUS: ऋतुराज डायमंड डकवर रनआऊट होताच स्टॉयनिसने उडवली जयस्वालची खिल्ली, पाहा Video

Ruturaj Gaikwad Run Out: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड एकही चेंडू न खेळता रनआऊट झाला.

Pranali Kodre

India vs Australia, 1st T20I Match at Visakhapatnam, Ruturaj Gaikwad Run Out:

गुरुवारी (23 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. विशाखापट्टणमला झालेल्या या सामन्यात भारताने अखेरच्या षटकात 2 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. मात्र, या सामन्यात उपकर्णधार ऋतुराज गायकवाड डायमंड डकचा शिकार झाला.

झाले असे की या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 209 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून सलामीला यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड फलंदाजीला उतरले होते.

यावेळी पहिले षटक टाकण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉयनिस उतरला. त्याच्या पहिल्या चार चेंडूत एक चौकार आणि एक षटकारासह जयस्वालने 10 धावा वसूल केल्या.

त्यानंतर पाचवा चेंडू जयस्वालने फाईन लेगला खेळला. त्यानंतर जयस्वाल आणि ऋतुराजने पहिली धाव सहज पळून काढली. मात्र, त्यानंतर जयस्वाल दुसरी धाव पळण्यासाठी निघाला, त्यावेळी ऋतुराजही अर्ध्याखेळपट्टीपर्यंत पळत पुढे आला, पण त्याचवेळी जयस्वालने दुसऱ्या धावेसाठी नकार देत मागे फिरला.

मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता, कारण नंतर ऋतुराज पुन्हा क्रिजमध्ये परतण्यापूर्वीच यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने स्टंपवरील बेल्स उडवले होते. त्यामुळे ऋतुराजला एकही चेंडू न खेळता धावबाद व्हावे लागले.

ज्यावेळी खेळाडू एकही चेंडू न खेळता शुन्यावर बाद होतो, त्याला डायमंड डक होणे, म्हटले जाते. दरम्यान, ज्यावेळी ऋतुराज धावबाद झाला, तेव्हा स्टॉयनिस जयस्वालच्या जवळ जाऊन मोठ्याने हसत त्याची खिल्ली उडवताना दिसला होता.

डायमंड डक होणारा तिसरा भारतीय फलंदाज

ऋतुराज हा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये डायमंड डक होणारा भारताचा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी जसप्रीत बुमराह आणि अमित मिश्रा हे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये डायमंड डकचा शिकार झाले आहेत.

साल 2016 मध्ये पुण्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी20 सामन्यात बुमराह डायमंड डकवर बाद झालेला, तसेच अमित मिश्रा 2017 साली नागपूरला इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी20 सामन्यात डायमंड डकवर बाद झालेला.

भारताचा विजय

दरम्यान, ऋतुराज बाद झाल्यानंतर तिसऱ्या षटकात जयस्वालही 8 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. पण त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी ताबडतोड फलंदाजी करत भारताला विजयाच्या जवळ पोहोचवले.

त्यानंतर रिंकू सिंगने फिनिशिंग टच देत भारताचा विजय निश्चित केला. सूर्यकुमारने 42 चेंडूत 80 धावांची खेळी केली, तर इशानने 39 चेंडूत 58 धावांची खेळी केली. तसेच रिंकूने 14 चेंडूत 22 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने 19.5 षटकात 8 विकेट्स गमावत 209 धावांचे आव्हान पूर्ण केले.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने जॉस इंग्लिसच्या (110) शतकाच्या आणि स्टीव्ह स्मिथने (52) अर्धशतकाच्या जोकावर 20 षटकात 3 बाद 208 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT