marcaim cricket team defeated arlem team Dainik Gomantak
क्रीडा

मडकई संघाची विजयी घौडदौड, आर्लेम संघाचा उडवला धुव्वा

सामना बुधवारी कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) दक्षिण विभागीय अ गट क्रिकेट स्पर्धेत मडकई युवक संघाने विजयी आगेकूच कायम राखताना आर्लेम संघाला 12 धावांनी नमविले. सामना बुधवारी कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला. (marcaim cricket team defeated arlem team)

आठव्या क्रमांकावरील अखिल फडते याने 51 चेंडूंत सात चौकार व दोन षटकारांच्या मदतीने केलेल्या 62 धावांच्या बळावर मडकई युवक संघाने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा केल्या. नंतर सिद्धेश नाईकने पाच गडी बाद करून संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. आर्लेमच्या अमेय धामसेकर (63, 47 चेंडू, 10 चौकार, 1 षटकार) व अंगदराज (50, 32 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार) यांची अर्धशतके व्यर्थ ठरली. (Goa Sports)

संक्षिप्त धावफलक

मडकई युवक संघ: 41 षटकांत सर्वबाद 208 (उन्मेष खेडेकर 45, फेलिक्स डायस 18, हरी सावंत 39, सिद्धेश नाईक 13, अखिल फडते 62, लक्ष्मण गावडा 11, विक्रांत प्रभू 1-55, बादल सिंग 2-35, अंगदराज 3-50, रोहित नाईक 1-32, योगेश नाईक 3-23) वि. वि. आर्लेम क्लब ः 31.3 षटकांत सर्वबाद 196 (अमेय धामसेकर 63, गोविंद लोटलीकर 29, अंगदराज 50, बादल सिंग 16, हरी सावंत 2-50, सिद्धेश नाईक 5-46, अखिल फडते 1-1).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT