पणजी: गोव्याच्या रणजी क्रिकेट संघ प्रशिक्षकपदासाठी (Goa Ranji Cricket Team Coach) कर्नाटकचे माजी वेगवान गोलंदाज आणि प्रशिक्षक मन्सूर अली खान (Mansoor Ali Khan) यांचे नाव विचाराधीन असल्याची माहिती गोवा क्रिकेट असोसिएशनचे (Goa Cricket Association) (जीसीए) सचिव विपुल फडके यांनी शुक्रवारी दिली.
विपुल यांनी सांगितले, की मन्सूर अली यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे आणि आम्ही त्यांच्याबाबत गांभीर्याने विचार करत आहोत. जीसीएची पुढील आठवड्यात बैठक होणार असून त्यावेळी प्रशिक्षक निवडीवर शिक्कामोर्तब होईल.
आगामी देशांतर्गत मोसमात गोव्याचा सीनियर क्रिकेट संघ रणजी करंडक, विजय हजारे करंडक एकदिवसीय आणि सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. गतमोसमात दोड्डा गणेश यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर सीनियर संघाचे प्रशिक्षकपद रिक्त आहे. सध्या या पदासाठी दिल्लीचे माजी फलंदाज भास्कर पिल्लई, ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटी वेगवान गोलंदाज शॉन टेट, मुंबईचे माजी रणजीपटू सुलक्षण कुलकर्णी, संदीप दहाड, गोव्याचे माजी रणजीपटू चंद्रा तेंडुलकर यांच्यासह मन्सूर अली खान यांनी जीसीएकडे अर्ज केले आहेत.
गोव्याच्या प्रमुख प्रशिक्षकपदी फलंदाजीत निष्णात असलेल्याची निवड झाल्यास आम्ही गोलंदाजीसाठी वेगळा प्रशिक्षक नियुक्त करणाबाबत विचार करत आहोत. या पदासाठी शॉन टेट यांनी अनुपलब्धता कळविल्यास मन्सूर अली यांना प्राधान्य राहील.
- विपुल फडके, सचिव गोवा क्रिकेट असोसिएशन
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.