Manoj Tiwary Dainik Gomantak
क्रीडा

Manoj Tiwary: फक्त पाच दिवसातच तिवारीचा यू-टर्न! अचानक निवृत्तीतून माघार, मोठे कारण आले पुढे

Manoj Tiwary Retirement: भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारीने 5 दिवसातच निवृत्तीचा निर्णय बदलला असल्याचे समजत आहे.

Pranali Kodre

Manoj Tiwary reverses Cricket retirement decision: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू मनोज तिवारीने अचानक यु-टर्न घेत त्याचा निवृत्तीचा निर्णय बदलला आहे. त्याने ३ ऑगस्ट रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र मंगळवारी (८ ऑगस्ट) त्याने निवृत्तीतून माघार घेतली असल्याचे समजत आहे. त्याने बंगाल क्रिकेटसाठी पुन्हा खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तिवारीने बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (कॅब)(CAB) अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याचा निर्णय बदलला आहे. तो आता मंगळवारी कॅबच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. तो मंगळवारी पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

मीडियातील रिपोर्ट्सनुसार स्नेहाषिश गांगुली यांनी त्याला पुढेही खेळण्याची विनंती केली होती. कारण त्याच्याच नेतृत्वाखाली गेल्यावर्षी बंगालने रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. पण बंगालला अंतिम सामन्यात सौराष्ट्र विरुद्ध ९ विकेट्सने पराभव स्विकारावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

तिवारीच्या संघातून बाहेर होण्याने मधल्या फळीत मोठी पोकळी निर्माण झाली असती. तो बंगालच्या सर्वात अनुभवी खेळाडू आहे.

तिवारीने ३ ऑगस्ट रोजी सोशल मीडिया पोस्ट करत निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्याने 'क्रिकेटच्या खेळाला अलविदा. या खेळाने मला सर्वकाही दिले आहे, मला म्हणायचे आहे की ती प्रत्येक गोष्ट दिली ज्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता,' असे म्हणत निवत्तीचा निर्णय जाहीर केला होता.

पश्चिम बंगालमध्ये क्रीडा मंत्री असलेल्या तिवारीने भारताकडून 12 वनडे आणि 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट फार काळ खेळू शकला नसला, तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने दीर्घकाळ क्रिकेट खेळले. त्याने पश्चिम बंगालकडून रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.

त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 141 सामने खेळले असून 9908 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 29 शतकांचा आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 32 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच त्याने 169 लिस्ट ए क्रिकेटमध्ये 6 शतके आणि 40 अर्धशतकांसह 5581 धावा केल्या आहेत आणि 63 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 183 टी20 सामने खेळले असून 15 अर्धशतकांसह 3436 धावा केल्या आहेत आणि 34 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodybuilder Roya Karimi: 14व्या वर्षी लग्न, 15व्या वर्षी आई... 'तालिबानी' बंधनं झुगारुन 'रोया करीमी' बनली टॉपची बॉडीबिल्डर; आज जगभर होतेय चर्चा

AUS vs ENG: पहिल्याच सामन्यात गरमागरमी, लाबुशेन-कार्स मैदानावर भिडले; बाचाबाचीचा व्हिडिओ तूफान व्हायरल

Earthquake in BAN vs IRE 2nd Test: बॉलिंग-बॅटिंग सोडून 'पळापळ'! भूकंपानं मैदान हादरलं, खेळाडूंंमध्ये भीतीचं वातावरण

Pakistan Factory Blast: पाकिस्तानात फॅक्टरीत भीषण स्फोट, 15 ठार, 7 जखमी; फॅक्टरीचा मालक फरार, मॅनेजरला अटक VIDEO

VIDEO: ना भरजरी साडी ना मेकअप! साऊथची 'ब्युटी क्वीन' साई पल्लवीचा 'IFFI' मध्येही पारंपरिक लूक, अभिनेत्रीच्या सौंदर्याची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT