Mannat Kashyap X/ICC
क्रीडा

INDW vs AUSW: U19 वर्ल्डकप गाजवलेल्या मन्नतची टीम इंडियात एन्ट्री, ऑस्ट्रेलियाला देणार आव्हान; पाहा Video

Mannat Kashyap: भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडेतून पदार्पण करणाऱ्या 20 वर्षांच्या मन्नत कश्यपबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

India Women vs Australia Women, 3rd ODI, Mannat Kashyap Debut:

भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात वनडे मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (2 जानेवारी) खेळला जात आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे.

या सामन्यातून भारताकडून 20 वर्षीय मन्नत कश्यपचे पदार्पण झाले आहे. ती भारताकडून वनडेत पदार्पण करणारी 142 वी महिला खेळाडू ठरली आहे. डावखुरी फिरकीपटू असलेल्या मन्नतला स्नेह राणा ऐवजी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

स्नेह राणानेच मन्नतला पदार्पणाची कॅप प्रदान केली. स्नेह राणा दुसऱ्या वनडे दरम्यान संघसहकारी पुजा वस्त्राकरला धडकली होती. त्याचमुळे कन्कशनच्या कारणाने तिला तिसऱ्या सामन्यात खेळता आलेले नाही.

कोण आहे मन्नत?

पटीयालामध्ये 15 डिसेंबर 2003 रोजी जन्मलेली मन्नत डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करते. तसेच तिच्याकडे खालच्या फळीत चांगली फलंदाजी करण्याचीही क्षमता आहे.

मन्नत सर्वातआधी प्रकाशझोतात आली तते गेल्यावर्षी 19 वर्षांखालील दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळताना जेव्हा तिने नॉन-स्ट्रायकरच्या फलंदाजाला धावबाद केले होते. मात्र, ते अपील भारताने नंतर मागे घेतले होते.

दरम्यान, मन्नतने 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाला पहिला टी20 वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तिने या स्पर्धेत 6 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या होत्या. ती या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारी पार्शवी चोप्रानंतर दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाज होती. तिने स्कॉटलंडविरुद्ध 4 विकेट्स घेतल्या होत्या.

मन्नत गेल्या वर्षापासून सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे. तिने युवा भारतीय महिला संघाला उदयोन्मुख आशिया चषक जिंकून देण्यातही मोलाचा वाटा उचलला होता. तिने युवा बांगलादेश महिला संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात 20 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या.

तिने भारतीय अ संघातही जागा मिळवली होती. आता मन्नतने भारताच्या वरिष्ठ संघातही जागा मिळवण्यात यश संपादन केले आहे. आगामी वर्ल्डकप स्पर्धांच्या दृष्टीने तिच्यासाठी छाप पाडण्याची ही मोठी संधी असणार आहे.

मन्नत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतून भारताकडून पदार्पण करणारी श्रेयंका पाटील आणि सायका इशाकनंतर तिसरी खेळाडू आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन -

  • यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, ऋचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, मन्नत कश्यप, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT