Manish Pandey  Dainik Gomantak
क्रीडा

Syed Mushtaq Ali Trophy: मनीष पांडेचे धमाकेदार पुनरागमन! 'सैयद मुश्ताक अली' टी-20 स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड; 14 नोव्हेंबरपासून रंगणार रणसंग्राम

Manish Pandey Syed Mushtaq Ali Trophy: भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असून, कर्नाटकचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार मनीष पांडेचे पुनरागमन चर्चेत आले.

Manish Jadhav

Manish Pandey Syed Mushtaq Ali Trophy: भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असून, कर्नाटकचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार मनीष पांडेचे पुनरागमन चर्चेत आले. मागील हंगामापासून कर्नाटकच्या संघातून बाहेर असलेला मनीष पांडे आगामी 'सैयद मुश्ताक अली टी-20' स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 34 संभाव्य खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. ही प्रतिष्ठित टी-20 स्पर्धा येत्या 14 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे.

मनीष पांडेने (Manish Pandey) आपला शेवटचा स्पर्धात्मक सामना या वर्षी मे महिन्यात खेळला होता, जेव्हा तो कोलकाता नाइट रायडर्सकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या घरगुती सामन्यात मैदानात उतरला होता. मात्र, विजय हजारे ट्रॉफीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत त्याला स्थान मिळालेले नाही.

दुसरीकडे, स्टार कसोटीपटू हनुमा विहारी याने चालू रणजी ट्रॉफी हंगामातून माघार घेतली. मागील हंगामात आंध्र प्रदेश सोडून त्रिपुरा संघाकडून खेळणारा 33 वर्षीय विहारी सध्याच्या रणजी मोहिमेत त्रिपुराकडून उपलब्ध होणार नाही. त्याने हैदराबादविरुद्धचा हंगामातील पहिला सामना खेळला होता, परंतु त्यानंतरच्या सलग दोन सामन्यांना तो मुकला होता. 'कर्नाटकविरुद्ध म्हैसूर येथे झालेल्या सामन्यानंतर वैयक्तिक कारणांमुळे विहारी यापुढे उपलब्ध राहणार नसल्याचे आम्हाला कळवण्यात आले,' अशी माहिती त्रिपुराचे प्रशिक्षक सत्रजित लाहिरी यांनी गुरुवारी दिली.

या अनपेक्षित माघारीनंतर त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनने संघात बदली खेळाडूचा समावेश करण्यासाठी बीसीसीआयकडे अधिकृत परवानगी मागितली. विहारीच्या अनुपलब्धतेमुळे त्रिपुरा संघाच्या मधल्या फळीला मोठा धक्का बसला असून, आगामी सामन्यांमध्ये संघाची रणनीती कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. देशांतर्गत क्रिकेटच्या या नव्या हंगामात अनुभवी खेळाडूंच्या अशा घडामोडींमुळे क्रिकेट वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Market Fire Safety: दुर्घटनेनंतरची धावपळ नको, आधीच सज्जता हवी; वास्कोच्या आगीने प्रशासनाला दिलेला इशारा

Vasco Market Fire: दिवाळीच्या तोंडावर स्वप्नांची राखरांगोळी! वास्कोतील आगीत 150 विक्रेत्यांचे संसार उद्ध्वस्त

Shadashtak Yog 2026: गुरु-शनीची युती ठरणार घातक! 31 ऑक्टोबरला बनतोय अशुभ 'षडाष्टक योग'; 3 राशींच्या अडचणीत होणार वाढ

VIDEO: 'रायन रिकेल्टन, तुझी आई सिंगल आहे का?' चाहत्याच्या पोस्टरने वेधलं लक्ष; क्रिकेटपटूची रिअ‍ॅक्शन व्हायरल, पाहा व्हिडिओ

Netanyahu Against Protest: निवडणूक निकालानंतर इस्रायली निदर्शकांचा रस्त्यांवर तांडव, नेतन्याहूंच्या घराला घेराव; 'अरब-यहूदी' सरकारची होतेय मागणी VIDEO

SCROLL FOR NEXT