World Table Tennis | Manika Batra  Dainik Gomantak
क्रीडा

World Table Tennis: धडाकेबाज विजयासह मनिका बत्रा उपउपांत्यपूर्व फेरीत

प्युएट्रो रिकोच्या ॲड्रियाना दियाझवर मात

किशोर पेटकर

World Table Tennis Star Contender 2023: महिला एकेरीतील भारताची अव्वल महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने गुरुवारी रात्री धडाकेबाज विजय नोंदवत वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानी असलेल्या प्युएट्रो रिकोच्या २२ वर्षीय ॲड्रियाना दियाझ हिला मनिकाने ३-१ (११-९, ११-८, ५-११, ११-८) असे पराजित केले. तुलनेत २७ वर्षीय मनिका जागतिक क्रमवारीत ३४व्या स्थानी आहे.

रंगतदार लढतीत मनिकाने २-० अशी आघाडी प्राप्त केली, मात्र ॲड्रियाना हिने तिसऱ्या गेममध्ये मुसंडी मारली. ३-३ अशा बरोबरीनंतर तिने मनिकाला मागे टाकत गेम जिंकला. चौथ्या गेममध्ये मनिकाने जबरदस्त खेळ केला. ती २-५ अशी पिछाडी पडली होती.

गतवर्षी आशिया कप टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीत ब्राँझपदक जिंकलेल्या मनिकाने नंतर सलग सात गुण प्राप्त करत ॲड्रियानाला ९-५ असे मागे टाकले व नंतर गेम जिंकून उपउपांत्यपूर्व फेरीतील जागा पक्की केली.

पुढील फेरीत आता मनिकासमोर जागतिक क्रमवारीत विसाव्या स्थानी असलेल्या चीनच्या डावखुऱ्या कियान तियान्यी हिचे आव्हान असेल. उपउपांत्यपूर्व फेरीत आता मनिका व सुतिर्था मुखर्जी यांच्यावर भारताच्या आशा असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

39 व्हिला, स्विमिंग पूलची परवानगी रद्द करा, तुये ग्रामसभेत मागणी; आयटी कन्व्हेन्शन सेंटर आणि कचरा प्रकल्पाला कडाडून विरोध

IND vs NZ ODI LIVE Streaming: मिशन न्यूझीलंड! रोहित- विराट मैदानात उतरणार! वनडे मालिकेचा थरार कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह?

Karapur Sarvan Illegal Constructions: बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरुन कारापूर-सर्वण पंचायतीची ग्रामसभा तापली, ग्रामस्थांच्या आरोपांमुळे गदारोळ

Marathi language: "मराठीला राजभाषा हा आमचा हक्क, भीक नाही!", प्राचार्य सुभाष वेलिंगकरांचा सावंत सरकारला स्पष्ट इशारा

सत्तेसाठी सारे, गावासाठी कोण? पंचांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामस्थ संताप; बेतकी-खांडोळा पंचायतीच्या कारभारावर गंभीर सवाल

SCROLL FOR NEXT