IIkay Gundogon Dainik Gomantak
क्रीडा

मँचेस्टर सिटीच्या कर्णधाराने FA Cup तर जिंकून दिलाच, पण त्याचा गोलही ठरला ऐतिहासिक, पाहा Video

Pranali Kodre

Manchester City won FA Cup: शनिवारी (3 जून) एफए कप स्पर्धेचा अंतिम सामना मँचेस्टर डर्बी म्हणजेच मँचेस्टर सिटी विरुद्ध मँचेस्टर युनायटेड संघात पार पडला. या सामन्यात मँचेस्टर सिटीने बाजी मारली. मँचेस्टर सिटीने हा सामना 2-1 अशा गोल फरकाने जिंकत विजेतेपद मिळवले. सिटीने यंदाच्या हंगामात जिंकलेले हे तिसरे मोठे विजेतेपद ठरले आहे.

हा अंतिम सामना शनिवारी लंडनमधील वेम्बली स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. हा सामना जिंकत सिटीने सातव्यांदा एफ कपवर नाव कोरले आहे. या सामन्या सिटीच्या विजयात कर्णधार इल्के गुंडोगनने मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याने ऐतिहासिक कारनामाही केला.

या सामन्यात सिटीसाठी दोन्ही गोल गुंडोगनने केले. तसेच युनायटेडसाठी एकमेव गोल ब्रुना फर्नांडिसने केला. दरम्यान, गुंडोगन या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूही ठरला.

गुंडोगनचा ऐतिहासिक गोल

गुंडोगनने सिटीला या सामन्यात शानदार सुरुवात करुन दिली होती. त्याने पहिल्या मिनिटातच पहिला गोल नोंदवला होता. त्याचा हा गोल विक्रमी ठरला. कारण त्याने केळ 13 सेकंदाच्या कालावधीत हा गोल केला. त्याने हा गोल इतका जलद केला की युनायडेटचा गोलकिपर डेव्हिड डी गिया याला गोल अडवण्याची कोणती संधीच मिळाली नाही.

त्यामुळे गुंडोगन एफए कपच्या अंतिम सामन्याच्या इतिहासात सर्वात जलद गोल करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 14 वर्षांपूर्वीचा लुईल साहाचा विक्रम मोडला आहे. लुईसने इव्हर्टनकडून 2009 साली झालेल्या अंतिम सामन्यात चेल्सीविरुद्ध 25 सेकंदात गोल केला होता.

गुंडोगनने करून दिली पुनरागमन

सिटीने गुंडोगनने केलेल्या पहिल्या मिनिटातील गोलने मिळवलेली आघाडी 33 व्या मिनिटापर्यंत कायम ठेवली होती. पण 33 व्या मिनिटाला फर्नांडिसने पेनल्टीवर गोल साकारत युनायटेडला बरोबरी साधून दिली होती. त्यामुळे पहिल्या हाफ संपला तेव्हा सामना 1-1 अशा बरोबरीत होता.

त्यामुळे दुसरा हाफ महत्त्वाचा ठरणार होता. पण सिटीसाठी पुन्हा एकदा कर्णधार गुंडोगनची कामगिरी महत्त्वाची ठरली. त्याने दुसऱ्या हाफच्या 6 व्या मिनिटालाच म्हणजे सामन्याच्या 51 व्या मिनिटात दुसरा गोल नोंदवला. त्यामुळे सिटीने 2-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र सिटीने युनाटेडला गोल करू दिला नाही. त्यामुळे हा अंतिम सामना जिंकत सिटीने विजेतेपदावर नाव कोरले.

भारतीय क्रिकेटपटूंनी लावली हजेरी

या सामन्यासाठी अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही हजेरी लावली आहे. कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 चा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनमध्येच होणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे.

त्याचमुळे या दरम्यान भारतीय क्रिकेटपटू एफए कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी वेम्बली स्टेडियवर उपस्थित होते. यामध्ये विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल अशा काही खेळाडूंचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT