Southampton FC beat Manchester City  Dainik Gomantak
क्रीडा

EFL Cup: मँचेस्टर सिटी क्लब लीग कपमधून बाहेर, साउथहँप्टनकडून पराभवाचा धक्का

Pranali Kodre

EFL Cup: बुधवारी लीग कप स्पर्धचा उपांत्यपूर्व सामना मँचेस्टर सिटी विरुद्ध साउथहँप्टन संघांमध्ये पार पडला. या सामन्यात साउथहँप्टनने मँचेस्टर सिटीला 2-0 अशा गोलफरकाने पराभवाचा मोठा धक्का दिला.

प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत साउथहँप्टन खाली असले तरी त्यांनी लीग कपमधून मँचेस्टर सिटीचे आव्हान संपुष्टात आणले आहे. तसेच साउथहँप्टनने मात्र उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

बुधवारी झालेलया सामन्यात साउथहँप्टनकडून सेकाऊ मारा आणि मौसा जेनेपो यांनी गोल केले. माराने लँकोने दिलेल्या पासवर पहिल्या हाफमध्ये 23 व्या मिनिटालाच साउथहँप्टनसाठी पहिला गोल नोंदवला. त्यानंतर पुढच्या 5 मिनिटातच जेनेपोने साउथहँप्टनची आघाडी वाढवली.

त्याने 28 व्या मिनिटाला मँचेस्टर सिटीच्या गोलरक्षकाला चूकवत साउथहँप्टनसाठी दुसरा गोल नोंदवला. दरम्यान, दुसऱ्या हाफमध्ये मँचेस्टर सिटीला ही पिछाडी भरून काढता आली नाही. मँचेस्टर सिटीची पासेसची अचूकता, चेंडूवरील नियंत्रण साउथहँप्टनपेक्षा चांगले होते. पण, तरी त्यांना गोल करू देण्यात साउथहँप्टनने रोखले.

(Manchester City out of the League Cup after suffering 2-0 defeat against Southampton)

सामन्याबद्दल साउथहँप्टनचा कर्णधार जेम्स वार्ड प्रोवसेने स्काय स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की 'ही खूप खास रात्र होती. जेव्हा तुम्ही लीगमध्ये संघर्ष करत असता, तेव्हा असा सामना विशेष असतो. आम्हाला माहित आहे हे लीगमधील कामगिरीपासून विचलित करणारे आणि चांगले प्रदर्शन होते. आम्ही निडर होऊन खेळलो.

'जेव्हा आम्ही आहोत, त्याठिकाणी जेव्हा असता, तेव्हा अशी कामगिरी कठीण असते. पण आमचे मॅनेजर शानदार आहेत. त्यांनी आम्हाना नवीन आयडीया आणि उर्जा दिली. आम्ही आक्रमक आणि निडरपणे खेळावे, असे त्यांना वाटत होते.'

मँचेस्टर सिटीने साल 2014 पासून सहावेळा लीग कपचे विजेतेपद जिंकले आहे. असे असताना त्यांचे लीग कपमधील आव्हान संपूष्टात आल्याने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT