Gautam Gambhir  Dainik Gomantak
क्रीडा

Gautam Gambhir Tweet: "भगोड़े अपनी अदालत...", विराटसोबत वादानंतर गंभीरच्या रडारवर कोण?

विराटबरोबर झालेल्या वादानंतर गौतम गंभीरने एक ट्वीट केले आहे, जे चर्चेचा विषय ठरताना दिसतंय

Pranali Kodre

Gautam Gambhir Tweet: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या संघात सामना झाला होता. या सामन्यानंतर बेंगलोरचा खेळाडू विराट कोहलीचे लखनऊचा खेळाडू नवीन उल हक आणि मार्गदर्शन गौतम गंभीर यांच्याबरोबर वाद झाले होते. या वादाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

त्यातच आता गंभीरने बुधवारी एक ट्वीट केले आहे, जे वाऱ्यासारखे व्हायरल होत आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिले आहे की "'दबावाचे' कारण देऊन दिल्ली क्रिकेटमधून पळून गेलेला माणूस क्रिकेटची चिंता म्हणून पीआर विकण्यास उत्सुक आहे! हे कलयुग आहे जिथे ‘पळपुटे’ आपले ‘अदालत’ चालवतात.'

त्याचे हे ट्वीट पत्रकार आणि दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष रजत शर्मा यांच्यावर निशाणा साधण्यासाठी केले असल्याचा कयास अनेक सोशल मीडिया युजर्सने लावला आहे.

कारण विराटबरोबर भांडण झाल्यानंतर एका टीव्ही शो मध्ये त्यांनी गंभीरला विराटचा मत्सर वाटतो, असे मत व्यक्त केले होते. त्यांनी याबद्दल टीव्ही शोवर मत मांडतानाचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसले की ते म्हणत आहे की निवडणूक जिंकल्यानंतर आणि खासदार झाल्यानंतर गंभीरचा अंहकार वाढला असून विराटची लोकप्रियता पाहून त्याला त्रास होतो. तसेच विराट हा आक्रमक खेळाडू असून कोणत्याही गोष्टी खपवून घेत नाही, त्यामुळे त्याने त्याला प्रतिउत्तर दिले, पण गंभीरचे वागणे खिलाडूवृत्तीच्या विरोधी होते आणि एक माजी खेळाडू आणि खासदार म्हणूनही न शोभणारे होते.

यानंतरच गंभीरने ट्वीट केले असून त्याने रजत शर्मा यांना त्यांनी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद सोडल्याबद्दलही टोला मारला असल्याचेही अनेक युजर्सने मत व्यक्त केले आहे.

कारण नोव्हेंबर 2019 मध्ये साधारण 20 महिन्यांच्या कालावधीनंतर रजत शर्मा यांनी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद सोडताना निवेदनात म्हटले होते की 'येथील क्रिकेट प्रशासन नेहमीच ओढाताण आणि दबावाने भरलेले असते. फायद्यासाठीचा स्वार्थ नेहमीच क्रिकेटच्या हिताच्या विरोधात सक्रियपणे काम करत असतो. मला वाटत नाही की मी माझ्या प्रामाणिकता, पारदर्शकता, सचोटी आणि तत्वाने इथे काम करू शकले, याबद्दल मी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करू शकत नाही.'

विराट - गंभीरमध्ये वाद

लखनऊला 1 मे रोजी झालेल्या सामन्यात आरसीबीने दिलेल्या 127 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊने 8 विकेट्स गमावल्यानंतर अमित मिश्रा आणि नवीन-उल-हक फलंदाजी करत होते. त्यावेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या विराटची त्यांच्याशी शाब्दिक चकमक झाली. तसेच सामना झाल्यानंतरही विराट आणि नवीन यांच्यात हात मिळवताना वाद झाले.

हे वाद पुढे इतके वाढले की लखनऊचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि विराट कोहली एकमेकांना भिडले. त्यांच्यातही कडाक्याचे भांडण झाल्याचे दिसले. तसेच दोन्ही संघातील खेळाडूंनी मध्यस्थी करत त्यांना एकमेकांपासून दूर केले होते.

या वादानंतर आयपीएलच्या आचार संहितेचा भंग झाल्याने बीसीसीआयकडून कारवाई देखील करण्यात आली. विराट आणि गंभीरवर सामनाशुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला, तर नवीनवर सामनाशुल्काच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला.

दरम्यान तो सामना बेंगलोरने 18 धावांनी जिंकला होता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT