Lasith Malinga Dainik Gomantak
क्रीडा

खुशखबर! मलिंगाची IPLमध्ये पुन्हा एन्ट्री

राजस्थान रॉयल्स ने इंडियन प्रीमियर लीग च्या 15 व्या हंगामासाठी श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली.

दैनिक गोमन्तक

राजस्थान रॉयल्स (RR) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या हंगामासाठी श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. मलिंगा प्रथमच या लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून चाहत्यांना दिसून येणार आहे. याआधी त्याने मुंबई इंडियन्सकडून अनेकदा विजेतेपद पटकावले आहे. (Malingas re entry in IPL)

38 वर्षीय मलिंगाने अलीकडेच श्रीलंकेच्या (Sri Lanka) ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यात श्रीलंका संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली होती. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरती ही माहिती दिली आहे.

2008 च्या हंगामातील विजेत्या संघ राजस्थान रॉयल्सला पहिल्या सत्रानंतर अंतिम फेरीत स्थान मिळवता आलेले नाही. संघाला केवळ प्लेऑफ सामन्यांपर्यंतच समाधान मानावे लागले, तर काही हंगाम राजस्थानने शेवटच्या स्थानावरती आणि 7व्या क्रमांकावरही संपवले गेले आहेत.

राजस्थानने 2021 मध्ये 5 विजय आणि 9 पराभवांसह सातव्या क्रमांकावरती हंगाम संपवला. राजस्थानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरती मलिंगाचे स्वतःच्या शैलीत स्वागत केले आहे. वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा पहिल्या सत्रापासून मुंबई इंडियन्ससोबत होता, त्याने शेवटचा सामना 2019 साली चेन्नईविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळला. या सामन्यातही मलिंगाने आपल्या गोलंदाजीने चौथ्यांदा विजेतेपद पटकावले होते.

मलिंगा पहिल्यांदाच मुंबई इंडियन्समधून वेगळ्या ड्रेसिंग रूममध्ये दिसून येणार आहे. राजस्थानसोबतच सध्या श्रीलंकेच्या महान खेळाडूंमध्ये गणले जाणारे कुमार संगकारा देखील क्रिकेटचे संचालक म्हणून उपस्थित असणार आहेत. यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात बरीच सुधारणा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

SCROLL FOR NEXT