गोव्याच्या एथनला पाचवा क्रमांक

राष्ट्रीय सबज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत एथनची चमकदार कामगिरी
Chess Competition
Chess Competitiondainik gomantak
Published on
Updated on

पणजी : नवी दिल्लीत झालेल्या ४६व्या राष्ट्रीय सबज्युनियर (१६ वर्षांखालील) बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याच्या एथन वाझ याला पाचवा क्रमांक मिळाला. रुबेन कुलासो, पार्थ साळवी, अभीर प्रभू यांनीही या स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व केले. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी क्रीडा संकुलात दिल्ली बुद्धिबळ संघटनेने अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या सहकार्याने स्पर्धा घेतली. (Ethan Vaz finished fifth in the National Subjunior Chess Championship)

कोविड-१९ महामारीमुळे तब्बल दोन वर्षे बोर्डवरील फिडे मानांकित बुद्धिबळ स्पर्धा (Chess competition) झाली नव्हती. त्यानंतर या वयोगटातील ही पहिलीच स्पर्धा ठरली. दहा वर्षीय एथनने संयुक्त दुसरा क्रमांक मिळविला, पण टायब्रेकर गुणांत त्याला पाचव्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तो सां जुझे द अरियल येथील किंग्ज स्कूलचा पाचव्या इयत्तेतील विद्यार्थी आहे. एथनने नऊ फेऱ्यांत सात गुण नोंदविले. त्याने २०३८ कामगिरी मानांकन नोंदविले. स्पर्धेत ब्राँझपदक (Bronze medal) जिंकलेल्या एस. हर्षद याच्याकडून एथनला स्पर्धेतील एकमेव पराभव पत्करावा लागला. हरियानाचा (Haryana) कँडिडेट मास्टर आदित्य ढिंगरा याला नमवून एथनने धक्कादायक निकालाची नोंद केली. या स्पर्धेतील स्पृहणीय खेळामुळे एथनच्या एलो मानांकनात २०८ गुणांची भर पडणार आहे.

गोव्याच्या अन्य खेळाडूंत मडगाव (Madgaon) येथील लॉयला हायस्कूलचा विद्यार्थी रुबेन कुलासो याने साडेसहा गुण नोंदविले. त्याला अकरावा क्रमांक प्राप्त झाला. त्याच्या एलो मानांकनात १२७ गुणांची भर पडेल. त्याने तमिळनाडूचा कँडिडेट मास्टर मृत्युंजय महादेवन याला तिसऱ्या फेरीत नमवून धक्कादायक विजयाची नोंद केली.

Chess Competition
ISL : समदच्या गोलमुळे ‘केरळा’चे पारडे जड

पर्वरी (porvorim) येथील चबी चिक्स स्प्रिंग व्हॅली हायस्कूलच्या पार्थ साळवी याला २५वा क्रमांक मिळाला. तो संयुक्त १६वा होता, परंतु टायब्रेकर गुणांत मागे पडल्यामुळे पहिल्या २० बक्षीस विजेत्या खेळाडूंत त्याला स्थान मिळू शकले नाही. गोव्याचा आणखी एक खेळाडू म्हापसा (Mhapsa) येथील सेंट ब्रिटो हायस्कूलचा नऊ वर्षीय अभीर प्रभू याने चार गुण नोंदविले. त्याची ही पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा (National competition) ठरली. त्याने चमक दाखविताना दोन विजय व दोन बरोबरीची नोंद केली.

तमिळनाडूचा प्रज्ञेश विजेता

तमिळनाडूचा इंटरनॅशनल मास्टर एम. प्रज्ञेश याने साडेसात गुणांसह स्पर्धेत विजेतेपद मिळविले. तमिळनाडूचा (Tamilnadu) आणखी एक इंटरनॅशनल मास्टर व्ही. प्रणव याला उपविजेतेपद, तर याच राज्याचा फिडे मास्टर एस. हर्षद याला तिसरा क्रमांक मिळाला. त्यांचे प्रत्येकी सात गुण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com