Mahendra Singh Dhoni  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: CSK साठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी, चाहते 'या' अपडेटने खूश!

CSK Big Update: चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएल 2023 चा पुढील सामना 17 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध होणार आहे.

Manish Jadhav

CSK Big Update: चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएल 2023 चा पुढील सामना 17 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध होणार आहे.

हा सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

धोनीच्या संघाला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 3 धावांच्या अगदी जवळच्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. अशा परिस्थितीत संघाला हा सामना जिंकण्याची पूर्ण आशा असेल.

चेन्नईसाठी आनंदाची बातमी

चेन्नई सुपर किंग्ज आणि त्यांच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे. संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त आहे.

टीमचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी ही माहिती दिली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, विश्वनाथन यांनी धोनीबद्दल सांगितले की, तो आगामी सामन्यात खेळणार आहे.

ते पुढे म्हणाले की, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (Rajasthan Royals) सामन्यात त्याला गुडघ्याचा त्रास झाला होता हे खरे आहे. मात्र, त्याने कोणालाच काही सांगितले नाही.

चेन्नईचा अगदी जवळून पराभव झाला

चेपॉक स्टेडियमवर बुधवारी (12 एप्रिल) झालेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 3 धावांनी पराभव केला.

राजस्थानने पहिल्यांदा फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर 8 बाद 175 धावा केल्या. यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 172 धावाच करु शकला. यासह राजस्थानने मोसमातील तिसरा विजय नोंदवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा सरकारला 'सर्वोच्च' दणका; प्रस्तावित व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात विकासकाम करण्यास बंदी, SC ने 2 आठवड्यांत मागितला अहवाल

'हे काय बोलून गेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री', भाजपमध्ये लवकरच भूकंप? सोशल मिडियावर रंगली चर्चा तर विरोधक म्हणाले, 'कामत खरं तेच बोलले

Nepal Protest Explained: जाळपोळ, दगडफेक करत नेपाळमध्ये लाखो तरूण रस्त्यावर का उतरलेत? सोशल मीडिया बंदी, भ्रष्टाचार आणि तेथील राजकारण समजून घ्या

Viral Video: मुर्खपणाचा कळस! रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपला, भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, पठ्ठ्याचा व्हिडिओ पाहून बसेल धक्का

Goa Live Updates: मुरगाव पालिकेत भरतीवरुन गदारोळ; NSUI आणि सावियो कुतिन्हो यांचा मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव

SCROLL FOR NEXT