Lungi Ngidi Against India Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: "वेग कमी करा, भारतीय बॅट्समनना आउट करा"! लुंगी एन्गिडीने सांगितले टेक्निक; इंडियन्सना चकवण्याचे अस्त्र केले उघड

Lungi Ngidi Against India: भारतीय फलंदाज आता वेगाला घाबरत नाहीत. उलटपक्षी वेगवान गोलंदाजाने मारा करताना वेग कमी केला की बिचकतात, हे शब्द होते लुंगी एन्गिडीचे.

गोमन्तक डिजिटल टीम

चेन्नई: भारतीय फलंदाज आता वेगाला घाबरत नाहीत. उलटपक्षी वेगवान गोलंदाजाने मारा करताना वेग कमी केला की बिचकतात, हे शब्द होते लुंगी एन्गिडीचे. भारतीय संघाला भल्या मोठ्या पराभवाचा फटका दिल्यानंतर एन्गिडी पत्रकारांशी बोलायला आला त्या वेळी सांगत होता.

मी बऱ्याच वेळा आयपीएल संघात होतो. पण बऱ्याच वेळा मला शेवटच्या ११ जणांच्या संघात जागा मिळत नसे. मला त्यातून खूप निराशा आली होती. ती झटकायला उपाय एकच होता, तो म्हणजे माझे गोलंदाजीतील कौशल्य वैविध्य वाढवणे.

मग निष्णात प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत केली. तसे बघायला गेले तर दोनच विविधता माझ्या संथ वेगाने टाकण्याच्या चेंडूत आहेत. त्याला मी टप्पा बदलून जास्त परिणामकारक बनवायचा प्रयत्न करतो. खूप मेहनत ते चेंडू विकसित करायला, त्यात सातत्य आणायला मी केले. त्याचे फळ मिळते तेव्हा समाधान होते, असे लुंगी एन्गिडीने मर्म सांगितले.

भारतीय फलंदाजांना रोखण्याचा मार्ग जणू काही समोरच्या संघातील गोलंदाजांना सापडला आहे. नव्या पिढीतील भारतीय फलंदाज ना वेगाला घाबरतात, ना स्विंगला चकतात.

त्यांना अडचणीत आणायला एक तर फिरकीचा मारा हवा किंवा वेगवान गोलंदाजांनी वेग खूप कमी करून टाकलेले चेंडू हवेत. भारतासमोरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी तेच अस्त्र वापरून योग्य परिणाम साधला.

निराशा लपवण्यासाठी गॉगलचा वापर

सोमवारी भारतीय संघातील खेळाडूंनी डोळ्यातील निराशा लपवायला गॉगलचा वापर करीत अहमदाबाद विमानतळावरून चेन्नईचे विमान पकडले. चेन्नईला पोहोचून खेळाडूंनी विश्रांती घेणे पसंत केले. मंगळवारी भारतीय संघ चेपॉक मैदानावर दक्षिण आफ्रिकेने विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास करायला, सरावाला उतरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT