Hardik Pandya | Mitchell Santner | Ekana Cricket Stadium  Dainik Gomantak
क्रीडा

India vs New Zealand, T20I: हार्दिकची खेळपट्टीवर नाराजी अन् एकाना स्टेडियमच्या क्युरेटरवर मोठी कारवाई

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या सामन्याच्या खेळपट्टीवर हार्दिकने नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर आता पीच क्युरेटरला मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

Pranali Kodre

India vs New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रविवारी (29 जानेवारी) टी20 मालिकेतील दुसरा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात दोन्ही संघाला 100 धावांच्या जवळपास पोहचतानाही संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे या स्टेडियमच्या खेळपट्टीवर भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्यानेही नाराजी व्यक्त केली होती.

आता त्यानंतर अशी माहिती समोर येत आहे की या एकाना स्टेडियमच्या पीच क्युरेटरला काढून टाकण्यात आले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यादरम्यान न्यूझीलंडने 99 धावा केल्या होत्या, तर भारताने 100 धावांचा पाठलाग केवळ एक चेंडू राखून पूर्ण केला होता. तसेच या सामन्यात एकाही फलंदाजाला षटकार मारता आला नव्हता. त्याचबरोबर या खेळापट्टीवर सर्वाधिक मदत फिरकी गोलंदाजांना मिळाली होती.

या सामन्याच्या खेळपट्टीबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला होता, 'पहिल्या दोन्ही टी20 सामन्यातील खेळपट्ट्या चकीत करणाऱ्या होत्या. मला कठीण खेळपट्ट्यांबद्दल काही तक्रार नाही, मी त्यासाठी तयार आहे. पण या दोन्ही खेळपट्ट्या टी20 क्रिकेटसाठी योग्य नव्हत्या. क्युरेटरने ज्या मैदानात सामने होणार आहेत, तेथील खेळपट्ट्या आधीच तयार करायला हव्यात.'

हार्दिकबरोबरच भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकांनीही खेळपट्टीवर टीका केली होती. यानंतर आता क्युरेटरला काढून टाकल्याचे समोर येत आहे.

रांचीला झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात देखील खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देणारी होती. त्या सामन्यात भारतीय संघाला 21 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.

(Lucknow's Ekana Stadium Pitch curator has been sacked)

काही रिपोर्ट्सनुसार एकाना स्टेडियमच्या क्युरेटरसने काळ्या मातीच्या दोन खेळपट्ट्या आधीच बनवून ठेवल्या होत्या. पण भारतीय संघाच्या संघव्यवस्थेकडून सामन्यात्या तीन दिवस आधी लाल मातीची ताजी खेळपट्टी बनवण्याची मागणी करण्यात आली होती. इतक्या कमी वेळेत खेळपट्टी पुरेशी योग्य बनू शकली नाही.

दरम्यान, एकाना स्टेडियमच्या क्युरेटरच्या जागेवर आता ग्वाल्हेरच्या संजीव अगरवाल यांची नियुक्ती झाली आहे. त्यांना आता आगामी आयपीएल हंगामासाठी खेळपट्टी बनवायच्या आहेत.

अहमदाबादला होणार तिसरा सामना

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ टी20 मालिकेत विजय मिळवेल. कारण पहिला सामना न्यूझीलंडने आणि दुसरा सामना भारताने जिंकला होता. त्यामुळे मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी झालेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT