Gautam Gambhir
Gautam Gambhir Dainik Gomantak
क्रीडा

लखनऊची प्लेऑफमध्ये एन्ट्री... गौतम गंभीरचा व्हिडीओ व्हायरल

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 ची (IPL 2022) नवीन फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 66व्या साखळी सामन्यात सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 2 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह लखनौच्या 14 सामन्यांतून 18 गुण झाले असून ते 10 संघांच्या गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. (Lucknow Super Giants entry in the playoffs Gautam Gambhir video goes viral)

दुसरीकडे, या पराभवामुळे केकेआरचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. सुपर जायंट्सच्या या रोमांचक विजयाने संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर खूपच खूश होता. डगआऊटमध्ये बसून गंभीरने आनंदाने नाचत टीमचा विजय साजरा केला. गंभीरने खेळाडूंना मिठी मारून आपला आनंद साजरा केला. गंभीरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या उच्च स्कोअरिंग सामन्यात दोन्ही संघांनी 200 हून अधिक धावा केल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना लखनौने निर्धारित 20 षटकांत एकही विकेट न गमावता 210 धावा केल्या आहेत. ओपनर क्विंटन डी कॉकने नाबाद 140 तर कर्णधार केएल राहुलने नाबाद 68 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने 8 गडी गमावून 208 धावा केल्या आहेत. तर मार्कस स्टॉइनिसने 20व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर दोन बळी घेत लखनौ टीमला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गौतम गंभीरच्या व्हिडिओमध्ये तो विजयानंतर डगआऊटमध्ये सेलिब्रेशन करताना दिसून येत आहे. गौतमने लगेच शेजारी बसलेल्या कोचिंग सपोर्ट स्टाफमधील विजय दहिया याला मिठी देखील मारली. यानंतर त्याने संघाचा वेगवान गोलंदाज मोहसीन खानलाही मिठी मारली आणि त्याचे अभिनंदन केले. गंभीरची ही अनोखी स्टाईल पाहून चाहते वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

केकेआरची बाजू पण रिंकू सिंग आणि सुनील नरेन यांनी शेवटच्या क्षणी केकेआरला विजयाच्या जवळ नेले, पण केकेआरचा पराभव झाला तेव्हा तीन धावा देखील झाल्या होत्या. दोन चेंडूंत गरज असताना स्टॉइनिसने एव्हिन लुईसच्या शानदार कॅचच्या बळावर रिंकू आणि उमेश यादवला बाद करून खेळाचा संपुर्ण पलटवार केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिक्षणसाठी भारतात आलेल्या नायजेरियन तरुणीचे भलतेच उद्योग; गोवा पोलिसांनी केली अटक

Tristate Meet: गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक पहिल्यांदाच समन्वय बैठक का घेतायेत? कोणत्या विषयावर होणार चर्चा

ED Goa: गोव्यातील विपुल शिपयार्ड कंपनीवर ईडीचा छापा, 12.20 कोटींची मालमत्ता जप्त

SBI FD Interest Rates: एसबीआयच्या करोडो ग्राहकांचे बल्ले-बल्ले, आजपासून नवीन व्याजदर लागू; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ?

Goa Indore Flight: खराब हवामानाचा फटका! एक तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला

SCROLL FOR NEXT