IPL 2022: हिट मॅन देणार अर्जुन तेंडुलकरला संधी?

फेब्रुवारीमध्ये झालेल्या मेगा लिलावात मुंबईने अर्जुनला 30 लाख रुपयांना घेतले.
Arjun Tendulkar
Arjun TendulkarDainik Gomantak
Published on
Updated on

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2022) 15वा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) वाया गेला असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. या वेळी हा संघ प्लेऑफमध्ये पात्र ठरू शकलेला नाहीये. या मोसमात मुंबईला सलग आठ पराभवांना सामोरे जावे लागले आहे. यामुळे ते IPL-2022 च्या प्लेऑफमध्ये जाऊ शकले नाहीत आणि या मोसमात या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ मुंबई ठरला आहे. (IPL 2022 Will Rohit Sharma give Arjun Tendulkar a chance to play)

Arjun Tendulkar
RCB vs GT IPL 2022|बंगळुरू प्लेऑफच्या मार्गात गुजरातचा अडथळा, विराट परतणार का?

अशा स्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघाने गेल्या काही सामन्यांमध्ये आपली बेंच स्ट्रेंथ चाचणी केली. मात्र, या संघाने अद्याप सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला संधी दिलेली नाहीये. अर्जुनला खेळवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे आणि आता भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रानेही अर्जुनला खेळवण्याची मागणी केली आहे.

मुंबईने या मोसमात आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले असून, तीन विजय, 10 पराभवांसह ते गुणतालिकेत सहा गुणांसह 10व्या स्थानावरती आहेत. त्याला अजून एक सामना खेळावा लागणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रंगणार आहे. हे दोन्ही संघ 21 मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने खेळले जाणार आहेत.

सर्वांना संधी दिली

फेब्रुवारीमध्ये झालेल्या मेगा लिलावात मुंबईने अर्जुनला 30 लाख रुपयांना घेतले. मुंबईने आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूला संधी दिली पण अर्जुनला संधी दिलेली नाहीये, असे आकाशने सांगितले आहे. आकाशने ट्विट करून लिहिले आहे की, अर्जुनने या मोसमातील फक्त शेवटचा सामना खेळावा. मुंबईने आपल्या संघातील जवळपास प्रत्येक खेळाडूला संधी दिली, आणि त्यांनाही ते पुर्ण करून पाहण्याची वेळ आली आहे."

Arjun Tendulkar
'जस्सी' चा नवा विक्रम, टी-20 मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

या खेळाडूंना संधीही मिळाली नाहीये

मुंबईने आतापर्यंत केवळ अर्जुनलाच नाही तर अन्य काही खेळाडूंना प्लेइंग-11 मध्ये संधी दिलेली आहे. या खेळाडूंमध्ये अर्जुन जुयाल, राहुल बुद्धी यांचा देखील समावेश आहे, तसेच आकाश मडवाल नुकताच संघात सामील झाला आहे. तो एक फलंदाज आहे आणि सध्या तोही त्याच्या आयपीएल पदार्पणाची वाट पाहत आहे. मुंबईने यंदाच्या मोसमात हृतिक शोकिन, कुमार कार्तिकेय सिंग, तिलक वर्मा, ट्रिस्टन स्टब्स, रमणदीप सिंग, संजय यादव, टिम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेव्हिस यांना संधी दिली आहे. यापैकी टिळक वर्मा यांनी खूप प्रभावित केले आहे. तसेच टिम डेव्हिड आणि ब्रेव्हिस त्याचबरोबर कार्तिकेयची फिरकीही मुंबईसाठी प्रभावी ठरली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com