Lucknow Super Giants Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: ‘जॉस’ द बॉसची खेळी ठरली व्यर्थ, KL राहुलच्या संघाचा राजस्थानवर दणदणीत विजय!

IPL 2023, RR vs LSG: आयपीएल 2023 चा 26 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यात खेळला गेला.

Manish Jadhav

IPL 2023, RR vs LSG: आयपीएल 2023 चा 26 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळला गेला.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना झाला. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघाने 10 धावांनी हा सामना जिंकला.

दुसरीकडे, राजस्थानबद्दल बोलायचे तर, त्यांनी जिंकलेला सामना गमावला आणि कर्णधार संजू सॅमसनची रनआउट ही टर्निंग पॉइंट ठरली.

राजस्थान आणि लखनऊ या दोन्ही संघांनी हंगामातील सहा पैकी प्रत्येकी चार सामने जिंकले आहेत.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतल्याने लखनऊने चांगली सुरुवात केली. केएल राहुल (32 चेंडूत 39) आणि काइल मेयर्स (42 चेंडूत 51) यांनी पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. मात्र, ही भागीदारी 11व्या षटकात तुटली.

यानंतर, लखनऊचा डाव फसला. आयुष बडोनी 1 आणि दीपक हुड्डा 2 धावा करुन बाद झाले. 103 च्या धावसंख्येवर लखनऊच्या चार विकेट पडल्या. अशा परिस्थितीत मार्कस स्टॉइनिस (16 चेंडूत 21 धावा) आणि निकोलस पूरन (20 चेंडूत 28) यांनी थोडी सावध फलंदाजी केली. पाचव्या त्यांनी विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली.

पुढे, लखनऊने 20 व्या षटकात तीन विकेट गमावल्या. तर पुरण आणि युधवीर सिंग चरक (1) धावबाद झाले. कृणाल पंड्या 40 धावा करुन नाबाद राहिला. राजस्थानकडून आर अश्विनने दोन बळी घेतले. जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दुसरीकडे, संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वाखालील आरआर विजयाच्या रथावर स्वार आहे. राजस्थानने आतापर्यंत चार विजय आणि एका पराभवाची नोंद केली आहे.

सॅमसन आर्मीने गेल्या तीन सामन्यांमध्ये विजयी पताका फडकवली आहे. दरम्यान, केएल राहुलच्या नेतृत्वाखालील एलएसजीने तीन जिंकले आहेत तर दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे.

एलएसजीला त्यांच्या मागील सामन्यात पंजाब किंग्जकडून (पीबीकेएस) पराभव पत्करावा लागला होता.

हेड टू हेड रेकॉर्ड कसे आहे?

याआधी लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एकूण दोन सामने झाले आहेत. लखनऊ संघाने आयपीएल 2022 मध्ये पदार्पण केले. संजू सॅमसनच्या संघाने त्या हंगामात दोन्ही वेळा केएल राहुलच्या संघाचा पराभव केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT