Quinton De Kock  Dainik Gomantak
क्रीडा

LSG vs MI IPL 2023: क्विंटन डी कॉकने रचला इतिहास, एबी डिव्हिलियर्सचा मोडला रेकॉर्ड!

IPL 2023, LSG vs MI: दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज क्विंटन डी कॉक सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे.

Manish Jadhav

IPL 2023, LSG vs MI: दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज क्विंटन डी कॉक सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे. मंगळवारी त्याने टी-20 क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम केला.

लखनऊ सुपर जायंट्सचा तुफानी फलंदाज डी कॉकने लखनऊच्या एकना स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध 12 धावा करताच टी-20 कारकिर्दीतील 9 हजार धावा पूर्ण केल्या. यासह त्याने दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला.

जगातील सहावा फलंदाज ठरला

डी कॉकने टी-20 कारकिर्दीतील 307 सामन्यांच्या 298 व्या डावात 9000 धावा पूर्ण केल्या. याबाबतीत त्याने एबी डिव्हिलियर्सचा (AB de Villiers) विक्रम मोडला. ज्याने 323 सामन्यांच्या 304 डावांमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

डिव्हिलियर्सचा विक्रम मोडत डी कॉक सर्वात जलद 9,000 धावा पूर्ण करणारा जगातील सहावा खेळाडू ठरला. त्याने शिखर धवन (308 डाव), मार्टिन गप्टिल (313 डाव), फाफ डू प्लेसिस (317 डाव), जोस बटलर (318 डाव) यांच्यासह अनेक दिग्गज फलंदाजांना मागे सोडले.

बाबर आझमच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे

टी-20 कारकिर्दीतील सर्वात जलद 9 हजार धावांचा विक्रम पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नावावर आहे. त्याने 254 सामन्यांच्या 245 डावांमध्ये हे स्थान गाठले.

ख्रिस गेल 249, विराट कोहली (Virat Kohli) 271, डेव्हिड वॉर्नर 273 आणि अॅरॉन फिंच हे 281 डावात हे स्थान मिळवणारे अव्वल फलंदाज आहेत. फिंचनंतर आता डी कॉकच्या नावाची नोंद झाली आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, कठीण खेळपट्टीवर डी कॉकला फक्त दोन षटकार मारता आले. त्याने 15 चेंडूत एकूण 16 धावा केल्या.

पीयूष चावलाने डी कॉकला ईशान किशनकरवी झेलबाद करुन पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर, चावलाने प्रेरक मंकडला शून्यावर बाद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

SCROLL FOR NEXT