Prince Yadav and Tristan Stubbs Fight Video Dainik Gomantak
क्रीडा

LSG vs DC: स्टब्सची फटकेबाजी अन् प्रिन्सची खुन्नस! लखनऊ विरुद्ध दिल्ली सामन्यात हायहोल्टेज ड्रामा; 'हॉट टॉक'ने वेधलं लक्ष VIDEO

Prince Yadav and Tristan Stubbs Fight Video: लखनऊचा गोलंदाज प्रिन्स यादव आणि दिल्लीचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्स यांच्यात मैदानावर शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

Manish Jadhav

Prince Yadav and Tristan Stubbs Fight Video: आयपीएल 2026 च्या हंगामात बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. या सामन्यात दिल्लीने बाजी मारली असली, तरी मैदानातील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लखनऊचा गोलंदाज प्रिन्स यादव आणि दिल्लीचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्स यांच्यात मैदानावर शाब्दिक चकमक पाहायला मिळाली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये निर्माण झालेला हा तणाव प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरला.

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनऊने 141 धावांचे माफक आव्हान दिल्लीसमोर ठेवले होते. मात्र, या छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार केएल राहुल शून्यावर बाद झाला, तर पथुम निसंका केवळ एक धाव करुन माघारी परतला. नितीश राणा (15) आणि अक्षर पटेल (0) हे देखील स्वस्त्यात बाद झाल्यामुळे अवघ्या 26 धावांवर दिल्लीचे 4 महत्त्वाचे गडी बाद झाले होते. अशा कठीण परिस्थितीत ट्रिस्टन स्टब्स फलंदाजीसाठी मैदानात उतरला. लखनऊचे गोलंदाज, विशेषतः प्रिन्स यादव, भेदक मारा करत दिल्लीच्या फलंदाजांवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.

डावाच्या पाचव्या षटकात ही घटना घडली. प्रिन्स यादवने षटकातील चौथा चेंडू टाकल्यानंतर तो ट्रिस्टन स्टब्सच्या दिशेने रागाने पाहू लागला. स्टब्सनेही त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. दोघांमध्ये काही शब्दांची देवाणघेवाण झाल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे, मात्र नेमके काय बोलणे झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्टार स्पोर्ट्सने आपल्या सोशल मीडिया (Social Media) हँडलवर हा व्हिडिओ शेअर करताना "मोठ्या सामन्यांमध्ये अशा छोट्या गोष्टी घडत असतात," असे कॅप्शन दिले. प्रिन्स यादवने स्टब्सवर मानसिक दडपण आणण्याचा प्रयत्न केला, पण स्टब्स डगमगला नाही.

मैदानातील या तणावानंतर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. प्रिन्स यादवने 3 षटकांत केवळ 20 धावा देऊन 2 गडी बाद केले आणि दिल्लीला अडचणीत आणले. दुसरीकडे, ट्रिस्टन स्टब्सने संयमी फलंदाजी करत 32 चेंडूत 39 धावांची नाबाद खेळी साकारली. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावत दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. अखेर दिल्ली कॅपिटल्सने 17 चेंडू राखून 6 गडी राखून हा सामना जिंकला. सामना संपला असला तरी प्रिन्स आणि स्टब्स यांच्यातील तो 'अ‍ॅग्रेशन'चा व्हिडिओ मात्र क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT