Lowest Team Total in ODI History Dainik Gomantak
क्रीडा

50 ओव्हरची मॅच, 35 धावा, 10 विकेट्स! वनडे क्रिकेटमधील सर्वात 'लाजिरवाणा' रेकॉर्ड; नेपाळ अन् श्रीलंकेच्या गोलंदाजांनी रचला इतिहास

Lowest Team Total in ODI History: एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी धावसंख्येवर बाद होण्याचा 'नकोसा' रेकॉर्ड दोन संघांच्या नावावर आहे.

Manish Jadhav

Lowest Team Total in ODI History: क्रिकेटच्या मैदानात दररोज नवनवीन विक्रमांची नोंद होत असते. प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की, आपल्या नावावर एखादा अभिमानास्पद विक्रम असावा, परंतु कधीकधी परिस्थिती अशी ओढवते की संघाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद होते. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी धावसंख्येवर बाद होण्याचा 'नकोसा' रेकॉर्ड दोन संघांच्या नावावर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, तब्बल 16 वर्षांच्या अंतरानंतर इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आणि दोन वेगवेगळ्या संघांनी एकाच धावसंख्येवर आपली डाळ शिजवली.

या नकोशा विक्रमाची पहिली ठिणगी पडली ती 2004 मध्ये. हरारे क्रिकेट ग्राउंडवर जिम्बाब्वे आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने होते. 50 षटकांच्या या सामन्यात जिम्बाब्वेचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा कोणालाही वाटले नव्हते की आज क्रिकेटच्या इतिहासातील एक काळे पान लिहिले जाईल. श्रीलंकेच्या धारदार गोलंदाजीसमोर जिम्बाब्वेच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. संपूर्ण संघ अवघ्या 18 षटकांत केवळ 35 धावांवर तंबूत परतला.

श्रीलंकेचा (Sri Lanka) दिग्गज वेगवान गोलंदाज चामिंडा वास याने या सामन्यात कहर केला. त्याने 9 षटकांत केवळ 11 धावा देऊन 4 बळी घेतले, ज्यात 4 षटके निर्धाव होती. त्याला परवेझ माहरुफने उत्तम साथ देत 3 धावांत 3 बळी टिपले. श्रीलंकेने हे आव्हान केवळ 9.2 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण करुन एकतर्फी विजय मिळवला.

अनेक वर्षे हा नकोसा विक्रम जिम्बाब्वेच्या नावावर होता, मात्र 2020 मध्ये अमेरिकेने या विक्रमाची बरोबरी केली. फेब्रुवारी 2020 मध्ये कीर्तीपूर येथे नेपाळ आणि अमेरिका यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यातही अमेरिकेचा संघ 50 षटके खेळणे तर लांबच, पण केवळ 12 षटकांत 35 धावांवर गारद झाला. नेपाळच्या संदीप लामिछानेने अवघ्या 6 धावांत 6 बळी घेत अमेरिकन फलंदाजीचे कंबरडे मोडले. नेपाळने विजयासाठी आवश्यक असलेले 36 धावांचे लक्ष्य अवघ्या 5.2 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात गाठले.

अशा प्रकारे 2004 मध्ये जिम्बाब्वेने नोंदवलेला 35 धावांचा नीचांकी धावसंख्येचा विक्रम 2020 मध्ये अमेरिकेने (America) पुन्हा जिवंत केला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात या दोन संघांच्या नावावर आता संयुक्तपणे सर्वात कमी धावसंख्येचा रेकॉर्ड नोंदवला गेला. आता भविष्यात एखादा संघ यापेक्षाही कमी धावसंख्येवर बाद होऊन हा विक्रम मोडीत काढतो की 35 धावांचा हा 'नकोसा' आकडा असाच कायम राहतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT