Pramod Sawant Launched Logo for National Games 2023 to be held in Goa
Pramod Sawant Launched Logo for National Games 2023 to be held in Goa Dainik Gomantak
क्रीडा

37th National Games Goa 2023: लगोरी, रोल बॉल, काल्लियारापट्टू'सह विविध पारंपरिक खेळांचे राष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण

किशोर पेटकर

National Games 2023: गोव्यात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण 43 खेळांचा विक्रमी सहभाग असेल, त्यात देशातील पारंपरिक खेळांचेही पदार्पण होईल.

रोल बॉल, पेंचाक सिलाट, स्क्वे मार्शल आर्ट, काल्लियारापट्टू हे परंपरागत खेळ, तसेच लगोरी आणि गतका हे प्रदर्शनीय खेळ असतील.

(37th National Games 2023 to be held in Goa)

37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या लोगोचे शानदार समारंभात रविवारी अनावरण झाले. त्यावेळी राज्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) परवानगीने स्पर्धेतील 43 खेळांची यादी जाहीर केली.

गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण 36 खेळांचा समावेश होता, तर त्यापूर्वी 2015 साली केरळमधील स्पर्धेत 33 खेळ होते.

‘‘गोव्यात होणाऱ्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण 43 खेळ असतील आणि स्पर्धेच्या इतिहासातील हा विक्रम आहे,’’ असे लोगो अनावरण कार्यक्रमात भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) संयुक्त सचिव कल्याण चौबे यांनी सांगितले.

स्पर्धेतील नव्या खेळांविषयी

आयओए तांत्रिक समिती शिष्टमंडळ मार्च महिन्यात गोवा भेटीवर आले असता रोल बॉल, पेंचाक सिलाट, स्क्वे मार्शल आर्ट व लगोरी या खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले होते.

पुणे येथील राजू दाभाडे यांनी प्रस्थापित केलेला रोल बॉल हा भारतीय खेळ आहे. पेंचाक सिलाट हा मार्शल आर्ट खेळ आहे. स्क्वे मार्शल आर्ट हा काश्मीरमधील जुनापुराणा आहे.

गोव्याने या खेळात राष्ट्रीय पातळीवर सातत्याने पदके जिंकली आहेत. लगोरी या देशी पारंपरिक खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धेतील समावेशासाठी गोव्याने जोर लावला होता.

गतका हा पंजाबमध्ये खूप लोकप्रिय असलेला प्राचीन मार्शल आर्ट खेळ आहे, तर काल्लियारापट्टू हा केरळमध्ये विकसित झालेला भारतीय मार्शल आर्ट खेळ आहे.

गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खेळ

जलतरण, तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बिलियर्डस-स्नूकर, बॉक्सिंग, कनोईंग-कयाकिंग, सायकलिंग, फुटबॉल व बीच फुटबॉल, तलवारबाजी, गोल्फ, जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल व बीच हँडबॉल, हॉकी, ज्युदो, कबड्डी, खो-खो, लॉन बॉल्स, मॉडर्न पेंटॅथलॉन, नेटबॉल, रोईंग, रग्बी, सेपॅक टॅक्रो, नेमबाजी, स्क्वॉश, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिस, ट्रायथलॉन, व्हॉलिबॉल

व बीच व्हॉलिबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, यॉटिंग, रोल बॉल, योग, मल्लखांब, पेंचाक सिलाट, स्क्वे मार्शल आर्ट, कालारीपायाट्टू, लगोरी (प्रदर्शनीय), गतका (प्रदर्शनीय).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT