Pramod Yadav
गोव्यात होणाऱ्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या लोगोचे रविवारी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये अनावरण झाले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी धनुष्याने नेम साधत लोगोचे अनावरण केले. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गोव्यात राष्ट्रीय नियोजित आहेत.
राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण 43 खेळ असतील. हा स्पर्धेच्या इतिहासातील विक्रम आहे.
लोगो अनावरण करण्यापूर्वी कार्यक्रमाचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
‘क्रीडा पर्यटन’ गोव्याची नवी ओळख ठरेल असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
आयओएचे संयुक्त सचिव कल्याण चौबे म्हणाले, पूर्वी गोवा फुटबॉलसाठी ओळखला जात असे. मी येथे फुटबॉलपटू या नात्याने भरपूर खेळलो आहे.
लोगोत गोव्याची आद्याक्षरे, नकाशा, चैतन्य, प्रेरणा, संस्कृती, जीवनशैली दडलेली आहे,’ अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली.