Lionel Messi receives grand welcome from PSG club Dainik Gomantak
क्रीडा

Lionel Messi: विश्वविजेच्या मेस्सीचे PSG संघात ग्रँड वेलकम! नेमारच्या कमेंटनेही वेधले लक्ष

मेस्सी पीएसजी संघात सामील झाल्यानंतर त्याचे जोरदार स्वागत झाले आहे.

Pranali Kodre

Paris Saint-Germain: साल 2022 अखेरीस लिओनल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने कतारमध्ये पार पडलेल्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. अर्जेंटिनाला तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकून देण्यात मेस्सीचे योगदान महत्त्वाचे ठरले. आता तो वर्ल्डकप जिंकल्यानंतर लीग स्पर्धा खेळण्यासाठी त्याचा पॅरिस सेंट-जर्मन (पीएसजी) संघात परतला आहे.

मेस्सीने कतारमध्ये त्याच्या कारकिर्दीतील पाचवा आणि अखेरचा वर्ल्डकप खेळला. यावेळी त्याने त्याच्या विश्वविजयाचे बहुप्रतिक्षित स्वप्नही पूर्ण केले. त्यामुळे ज्यावेळी तो पीएसजी संघात सामील झाला, त्यावेळी त्याचे जल्लोषात स्वागत झाले.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर मेस्सी आणि अर्जेंटिना संघाने मायदेशात जोरदार सेलिब्रेशन केले. त्यामुळे तो लीग १ हंगामासाठी पीएसजी संघात सुरुवातीच्या सामन्यांचा भाग नव्हता. पण आता तो पीएसजी संघात पुढील सामन्यांसाठी सामील झाला आहे.

(Lionel Messi receives grand welcome from PSG club)

दरम्यान, ज्यावेळी तो पार्क दे प्रिन्सेस येथे ट्रेनिंगसाठी आला त्यावेळी पीएसजी संघातील त्याच्या संघसहकाऱ्यांनी आणि सपोर्ट स्टाफने त्याला गार्ड ऑफ ऑनर देत स्वागत केले. यावेळी त्याला स्पोर्टिंग डायरेक्टर लुईस कँपो यांच्याकडून एक ट्रॉफीही देण्यात आली. त्याला गार्ड ऑन ऑनर देणाऱ्या सदस्यांमध्ये नेमार आणि कायलिन एमबाप्पेचा लहान भाऊ देखील होता.

मेस्सी ज्यावेळी पॅरिस विमानतळावर आला होता. त्यावेळीही त्याचे चाहत्यांकडून जोरदार स्वागत झाले होते. त्याची झलक पाहाण्यासाठी हजारो चाहते उपस्थित होते.

तसेच नेमारने मेस्सीला मिठी मारून त्याचे कौतुक करतानाचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की मेस्सी पीएसजी संघात आल्यानंतर नेमारने त्याला 'विश्वविजेता कसा आहेस तू?' असे विचारत मिठी मारली.

दरम्यान, लीग 1 हंगामात पीएसजीला पहिला पराभव लेन्सविरुद्ध स्विकारावा लागला आहे. असे असले तरी पीएसजी 44 पाँइंट्ससह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे.

मेस्सीची वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी

मेस्सीने वर्ल्डकप 2022 मध्ये 7 गोल केले आहेत. त्यामुळे त्याला गोल्डन बॉल मिळाला होता. त्याने फ्रान्सविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यातही अर्जेंटिनासाठी महत्त्वाचे 2 गोल केले होते. अर्जेंटिनाने हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकला होता.

पेनल्टी शूटआऊटमध्येही त्याने अर्जेंटिनासाठी पहिला गोल केला होता. याच सामन्यात त्याचा पीएसजीमधील संघसहकारी एमबाप्पेने 3 गोल नोंदवले होते. मात्र, अर्जेंटिनाने या सामन्यात बाजी मारली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

TTP Attacks Pakistani Army: पाकिस्तानला मोठा झटका! खैबर पख्तूनख्वामध्ये 'टीटीपी'चा सैन्याच्या ताफ्यावर भीषण हल्ला, 10 जवान ठार VIDEO

समुद्री मार्ग झाला खुला! 7 वर्षांनंतर मुरगाव पोर्टवर सुरू होणार कंटेनर सेवा, निर्यातदारांना मोठा दिलासा

World Record! 11 चेंडूत 8 षटकार... युवा फलंदाजानं ठोकलं सर्वात जलद अर्धशतक, स्फोटक फलंदाजीचा VIDEO पाहाच

SCROLL FOR NEXT