Lionel Messi|FIFA World Cup Dainik Gomantak
क्रीडा

Lionel Messi Reacts: 'हा मोठा धक्का, पण...', मेस्सीची सौदीविरुद्धच्या पराभवानंतर मोठी प्रतिक्रिया

FIFA World Cup 2022 मध्ये अर्जेंटिनाला सौदी अरेबियाकडून 2-1 अशा गोलफरकाने पराभव स्विकारावा लागला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Lionel Messi Reacts: कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये मंगळवारी अर्जेंटिनाला सौदी अरेबियाकडून धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. ग्रुप सी मधील सामन्यात सौदीने बलाढ्य अर्जेंटिनाला 2-1 अशा गोलफरकाने पराभूत करत त्यांची सलग 36 सामन्यांत अपराजित राहण्याची मालिका खंडीत केली. या पराभवानंतर अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे.

अर्जेंटिनाच्या पराभवानंतर मेस्सी (Lionel Messi) म्हणाला, ''हा मोठा धक्का होता. पराभवाने नेहमीच वाईट वाटते. पण आम्हाला आमच्यावरील विश्वास कायम ठेवावा लागणार आहे. आमचा संघ हार मानणार नाही. आम्ही मेक्सिकोला पराभूत करण्याचा प्रयत्न करू."

तसेच 35 वर्षीय मेस्सी म्हणाला, ''आम्हाला माहित आहे की सौदी अरेबियाच्या संघात चांगले खेळाडू आहेत, जे हाय लाईनला चांगले खेळतात. आम्ही त्यावर काम केले होते, पण आम्ही थोडी घाई केली. पण, आम्ही पराभवासाठी कोणतीही सबब सांगणार नाही. आम्ही पुढेही पूर्वीपेक्षाही जास्त एकत्रित खेळ करू."

त्याचबरोबर मेस्सी पुढे असेही म्हणाला की, हा संघ मजबूत आहे आणि त्यांनी ते यापूर्वी दाखवले आहे. आम्ही बऱ्याच काळात या परिस्थितीत आलो नव्हतो. आता हा संघ किती चांगला आहे, हे दाखवण्याची वेळ आली आहे. आम्हाला आता परत जाऊन आम्ही कोण आहोत आणि पुढे येणाऱ्या गोष्टींचा विचार करावा लागेल."

मेस्सीने सौदीविरुद्ध (Saudi Arabia) पहिल्या 10 मिनिटातच गोल करून अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, सौदीकडून सालेह अलशेहरीनी सालेम अलदौसरी यांनी प्रत्येकी एक गोल करत अर्जेंटिनाला पराभवाचा सामना करायला लावला.

दरम्यान, अर्जेंटिना (Argentina) 1986 पासून फिफा वर्ल्डकप विजेतेपदाची प्रतिक्षा करत आहेत आणि यंदा त्यांना वर्ल्डकप विजयासाठी प्रबळ दावेदारही मानले जात आहे. त्यामुळे आता स्पर्धेत पुढे अर्जेंटिना कशी कामगिरी करणार, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. अर्जेंटिनाला आता 27 नोव्हेंबर रोजी मेक्सिको विरुद्ध दुसरा सामना खेळायचा आहे. तसेच 1 डिसेंबर रोजी पोलंडविरुद्ध तिसरा सामना खेळायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT