Lionel Messi
Lionel Messi Dainik Gomantak
क्रीडा

Lionel Messi @700: मेस्सीने रचला मोठा रेकॉर्ड, रोनाल्डोपेक्षा 104 सामने कमी खेळत केला विक्रमी गोल

Pranali Kodre

Lionel Messi: रविवारी लीग 1 स्पर्धेत पॅरिस सेंट-जर्मेन क्लबचा (PSG) मार्सेएल क्बलविरुद्ध सामना झाला. या सामन्यात पीएसजीने सहज 3-0 असा विजय मिळवला. पीएसजीच्या या विजयात लिओनेल मेस्सी आणि कायलिन एमबाप्पे यांनी मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच मेस्सीने या सामन्यादरम्यान एका मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे.

रविवारी झालेल्या सामन्यात मेस्सीने पीएसजीसाठी दुसरा गोल नोंदवला होता. त्याने 29 व्या मिनिटालाच त्याचा पहिला आणि क्लबचा दुसरा गोल नोंदवला. त्याला एमबाप्पेने पास दिला होता, ज्यावर त्याने गोल केला. हा गोल मेस्सीसाठी विक्रमी ठरला. कारण त्याने या गोलसह त्याच्या कारकिर्दीत 700 क्लब गोलचा टप्पा पार केला.

हा पराक्रम करणारा मेस्सी केवळ दुसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा पराक्रम पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने केला आहे.

(Lionel Messi completed 700th goal in his club career.)

रोनाल्डोने त्याच्या या 700 गोलपैकी सर्वाधिक गोल बार्सिलोना क्लबसाठी केले आहेत. त्याने या क्लबसाठी 17 वर्षे फुटबॉल खेळले आहे. त्याने बार्सिलोनाकडून खेळताना 672 गोल केले आहेत. तो 2021 मधील ट्रान्सफर विंडोतून पीएसजी संघात सामील झाला. या संघाकडून खेळताना त्याने आत्तापर्यंत 28 गोल केले आहेत.

मेस्सीने 840 क्लब सामने खेळताना 700 गोलचा आकडा गाठला आहे. रोनाल्डोने 944 क्लब सामन्यांमध्ये 700 गोल पूर्ण केले होते. रोनाल्डोच्या नावावर सध्या 709 गोल आहेत. यातील 5 गोल त्याने स्पोर्टिंग लिस्बॉनसाठी 145 गोल मँचेस्टर युनायटेडसाठी, 450 गोल रिअल मद्रिदसाठी, 101 गोल युवेंट्ससाठी आणि 8 गोल अल नासर क्लबसाठी केले आहेत.

दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर मेस्सीनंतर कायलिन एमबाप्पेने दोन गोल नोंदवले. त्याने 25 व्या मिनिटाला पहिला गोल करत पीएसजीला खाते उघडून दिले होते. त्यानंतर त्याने 55 व्या मिनिटाला त्याचा दुसरा आणि क्लबचा तिसरा गोल नोंदवला. यासह एमबाप्पेनेही पीएसजीसाठी 200 गोल पूर्ण केले आहेत.

पीएसजीने मिळवलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली होती. त्यामुळे मार्सेएलला पुनरागमनाची संधी मिळाली नाही आणि त्यांना सामना पराभूत व्हावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT