Virender Sehwag Instagram /@virendersehwag
क्रीडा

Legends Cricket League: विरेंद्र सेहवागची भारतीय महाराज संघाच्या कर्णधारपदी निवड

क्रिकेटमधून (Cricket) निवृत्त झालेले खेळाडू लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये (Legends Cricket League) खेळताना दिसणार आहेत.

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट टीमचे माजी सलामवीर विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) बुधवारपासून सुरू होणाऱ्या लेजेंड्स लीग क्रिकेट T20 स्पर्धेत भारतीय महाराज या माजी भारतीय क्रिकेटपटूंच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. इंडियन प्रीमियम लीगमध्ये अनेक वेळा भारतीय संघाव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या सेहवागकडे (Virender Sehwag) उपकर्णधार म्हणून मोहम्मद कैफ असेल तर ऑस्ट्रेलियाचे वर्ल्ड कप विजेते प्रशिक्षक जॉन बुकानन हे प्रशिक्षक असतील.

पाकिस्तानचा (Pakistan) माजी कर्णधार मिसबाह- उल- हक आशिया लायन्स संघाचे नेतृत्व करणार आहे. या संघात पाकिस्तानचा, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा सहभाग आहे. या संघात शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर, मोहम्मद हाफिज, उमर गूल, सनथ जयसूर्या, तिलकरत्ने दिलशान, चामिंडा वास आणि हबीबुल बशरसारखे खेळाडू आहेत. आशिया लायन्सने दिलशानची उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे तर, 1996 चा आयसीसी वर्ल्ड कप (ICC World Cup) विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा याला प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

वर्ल्ड जायटस् या स्पर्धेत तिसऱ्या संघाचे नेतृत्व वेस्ट इंडियाचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी करणार आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार डेनियल व्हिटोरी, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली. इंग्लंडचा केविन पिटरसन, दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इम्रान तारीर या संघात असणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज जॉन्टी रोड्स वर्ल्ड जायंट्स संघाचा खेळाडू सह- प्रशिक्षक असेल. एलएलसी टी-20 स्पर्धेत आयुक्त रवी शास्त्री म्हणाले, ' हे खेळाडू निवृत्त झाले आहेत पण तरीसुद्धा त्यांना क्रिकेटची खूप अआवड आहे. मला खात्री आहे की ते पुढील 10 दिवसात त्यांच्या टीमसाठी उत्तम कामगिरी दाखवतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT