Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli Captaincy: कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर विराटने सोडले मौन

कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या निर्णयावर माजी भारतीय कर्णधाराने या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे.

दैनिक गोमन्तक

कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या निर्णयावर माजी भारतीय कर्णधाराने या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. संघाचे नेतृत्व करण्यासाठी कर्णधार होण्याची गरज नसल्याचे विराटचे म्हणणे आहे. After (leaving The Test Captaincy Virat Kohli Has Clarified His Role)

फायरराइड चॅटशी संवाद साधताना विराट (Virat Kohli) म्हणाला, “महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) भारताचे कर्णधारपद सोडले तेव्हा मी देखील संघाचा एक भाग होतो. कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतरही तो संघाचा प्रमुख होता. धोनीकडून आम्ही अनेक सूचना घेतल्या. जेव्हा मी भारताचा कर्णधार झालो तेव्हा संघाचं कल्चर चेंज बदलण्याची जबाबदारी माझ्याकडे आली. कारण भारतीय खेळाडूंकडे अफाट क्षमता आहे. जगात क्वचितच असा कोणताही देश असेल ज्याकडे असे कुशल खेळाडू असतील."

विराट आता भारतीय संघाकडून फलंदाज म्हणून खेळणार आहे. यावर तो म्हणाला, "मला वाटतं, तुम्हाला काय मिळवायचं आहे आणि काय साध्य करायचं याची समज असायला हवी? प्रत्येक गोष्टीची एक कालमर्यादा असते आणि तुम्हाला याची जाणीव असायला हवी. "एक फलंदाज म्हणून तुम्ही संघाला अधिक देऊ शकता, त्यामुळे त्याचा अभिमान बाळगा."

पुढे तो म्हणाला, "मोठे होणे हा देखील नेतृत्वाचा एक भाग आहे. मला वाटते की प्रत्येक भूमिकेसाठी आणि जबाबदारीसाठी तयार असले पाहिजे. मी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलो आणि नंतर कर्णधार झालो पण माझी विचारसरणी नेहमीच सारखीच होती. मी नेहमी असाच विचार केला आहे.''

विराटने 68 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले ज्यात टीम इंडियाने (Team India) 40 सामने जिंकले आहेत, जे कोणत्याही भारतीय कर्णधारापेक्षा जास्त आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

Goa Bench: निवृत्त कर्मचारी सेवा नियमांत बदल; निवृत्तीवेतनाची थकबाकी देण्यास एक वर्षाची मुदत

SCROLL FOR NEXT