Laxmikant Kattimani Hyderabad FC Dainik Gomantak
क्रीडा

हैदराबादने वाढवला कट्टीमणीचा करार

गोलरक्षकाला मुदतवाढ; आणखी दोन वर्षांसाठी आयएसएल विजेत्या संघात

किशोर पेटकर

पणजी : अनुभवी गोमंतकीय फुटबॉल गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणी याचा करार हैदराबाद एफसीने वाढविला आहे. आयएसएल स्पर्धेतील गतविजेत्या संघात तो आणखी दोन वर्षे असेल.

हैदराबाद एफसीने कट्टीमणीला 2023-24 मोसमाअखेरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे शुक्रवारी जाहीर केले. या वर्षी मार्चमध्ये हैदराबादने केरळा ब्लास्टर्सला हरवून आयएसएल स्पर्धा जिंकली. त्यावेळी पेनल्टी शूटआऊटमध्ये अतिशय दक्ष गोलरक्षण केलेला कट्टीमणी हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. 33 वर्षीय गोलरक्षक आयएसएल अंतिम लढतीचा मानकरी ठरला होता. त्याने चार पेनल्टी फटके अडवून हैदराबादचे विजेतेपद साकारण्यात मोलाचा वाटा उचलला.

‘‘हैदराबाद एफसीच्या नव्या करारावर सही करताना मला खूप आनंद होत आहे. माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल क्लबचा कृतज्ञ आहे. आमचा समूह अविश्वसनीय असून एका कुटुंबाप्रमाणे आहे. भविष्यात आणखी खूप यश प्राप्त करण्याचा विश्वास वाटतो,’’ असे कट्टीमणी याने सांगितले. संधी देत आत्मविश्वास उंचावल्याबद्दल त्याने प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांचेही आभार मानले. आयएसएल स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे कट्टीमणीस भारतीय फुटबॉल संघातही जागा मिळाली. हल्लीच झालेल्या एएफसी आशिया कप स्पर्धेच्या पात्रता फेरीत तो भारतीय संघात होता.

आयएसएलमधील दीर्घानुभवी

लक्ष्मीकांत कट्टीमणी आयएसएल स्पर्धेतील दीर्घानुभवी गोलरक्षक आहे. 2014 पासून तो 81 आयएसएल सामने खेळला असून 42 सामन्यांत त्याने हैदराबादचे प्रतिनिधित्व केले आहे. आयएसएल कारकिर्दीत त्याने एकूण 14 सामन्यांत एकही गोल स्वीकारला नाही, त्यापैकी नऊ वेळा त्याने हैदराबादतर्फे अशी कामगिरी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Market: डिचोलीत बाजारपेठेला लाभला नक्षत्रांचा साज, नाताळाची लगबग; ख्रिसमससाठी खरेदी जोरात

Stray Cattles: रेडेघाटीतील भटक्या गुरांचा संचार आवरा, वाहनचालकांची मागणी; रस्त्यावर बसणाऱ्या गुरांमुळे मनस्ताप

सोनसोडो प्रकल्प परिसरात 20 टन वैद्यकीय कचरा, मडगाव पालिकेवर होणार कारवाई; प्रदूषण नियंत्रण मंडळाची पालिकेला नोटीस

Verna Fire: भंगारअड्ड्याच्या मालकाचे सर्व आरोप खोटे, शरीफ कोणतेही भाडे देत नसल्याचा जुझे कुटुंबीयांचा दावा

Vasco Bangalore Special Train: नाताळ आणि नववर्षानिमित्त धावणार विशेष रेल्वेगाड्या, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT