Lahiru Thirimanne Announces Retirement Dainik Gomantak
क्रीडा

Lahiru Thirimanne Announces Retirement: श्रीलंकेच्या वर्ल्ड चॅम्पियनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला अलविदा, म्हणाला...

Sri Lanka: श्रीलंकेचा विश्वविजेता खेळाडू लाहिरु थिरिमाने याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. त्याने शनिवारी (22 जुलै) सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली.

Manish Jadhav

Lahiru Thirimanne Announces Retirement: श्रीलंकेचा विश्वविजेता खेळाडू लाहिरु थिरिमाने याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. त्याने शनिवारी (22 जुलै) सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली.

देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा सन्मान असल्याचे तो म्हणाला. हा धडाकेबाज फलंदाज अनेक महिने संघाबाहेर होता.

त्याने मार्च 2022 मध्ये श्रीलंकेसाठी शेवटचा सामना खेळला होता, जो एक कसोटी होता. थिरिमानेने जानेवारी 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

थिरिमानेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले की, “देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही खूप सन्मानाची बाब आहे. 13 वर्षांच्या प्रवासात माझ्यासोबत खूप गोड आठवणी आहेत. आता पुढच्या स्टॉपवर भेटू."

थिरिमानेच्या पोस्टवर चाहते आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. अनेक चाहत्यांनी लिहिले की, आम्ही थिरिमानेला मिस करु आणि त्याच्या नवीन प्रवासासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

दुसरीकडे, थिरिमानेने 197 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 3 शतके आणि 10 अर्धशतकांसह 2088 धावा केल्या. या कालावधीत त्याची सरासरी 26.43 होती. थिरिमानेने 127 सामन्यांत 34.77 च्या सरासरीने 3164 धावा केल्या.

त्याने 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये 4 शतके आणि 21 अर्धशतक ठोकले. त्याने 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 16.17 च्या सरासरीने 291 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याने एकही अर्धशतक झळकावले नाही.

तसेच, थिरिमाने 2014 मध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या श्रीलंकेच्या (Sri Lanka) संघाचा भाग होता. त्यानंतर फायनलमध्ये श्रीलंकेने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. विजेतेपदाच्या सामन्यात थिरिमानेने अवघ्या 7 धावा केल्या.

त्याचवेळी, उपांत्य फेरीत थिरिमानेचा जलवा पाहायला मिळाला. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 35 चेंडूत 44 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. ज्यामध्ये त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले होते. पावसाने प्रभावित झालेल्या उपांत्य फेरीत श्रीलंकेने 27 धावांनी विजय मिळवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT