Harbhajan Singh  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: भज्जी भडकला अन् कुलदीपबाबत थेटच बोलला

Harbhajan Singh: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सामनावीर ठरलेल्या कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटीत वगळण्याच्या निर्णयाने क्रिकेटविश्वातील तमाम दिग्गजांना आश्चर्य वाटत आहे.

दैनिक गोमन्तक

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सामनावीर ठरलेल्या कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटीत वगळण्याच्या निर्णयाने क्रिकेटविश्वातील तमाम दिग्गजांना आश्चर्य वाटत आहे. संघ निवडीवरुन अनेक माजी दिग्गजांनी संताप व्यक्त केला आहे. भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर म्हणाले की, 'कुलदीपला संघातून वगळण्याचा निर्णय अविश्वसनीय आहे.' त्याचबरोबर हरभजन सिंगनेही नाराजी व्यक्त केली आहे. भज्जी म्हणाला की, 'कुलदीप यादवने 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार घेणे थांबवावे किंवा त्याने एका सामन्यात 5 विकेट घेणे थांबवावे.'

हरभजनने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'मला वाटते कुलदीप यादवने आता 5 विकेट घेणे थांबवले पाहिजे. कुणास ठाऊक, असे केल्याने त्याला सलग दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळेल.' वास्तविक, कुलदीप यादव 22 महिन्यांनंतर टीम इंडियाच्या (Team India) टेस्ट ब्रिगेडमध्ये परतला आहे.

तसेच, कुलदीपने चितगाव येथे खेळल्या गेलेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 8 बळी घेतले आणि 40 धावांची उत्कृष्ट खेळीही खेळली. त्याची कामगिरी पाहता त्याला 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आले. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि त्याच्या जागी जयदेव उनाडकटचा संघात समावेश करण्यात आला.

शानदार खेळीनंतरही 2 वर्षे वाट पाहावी लागली

कुलदीपला संघातून वगळण्यात आल्याने हरभजन सिंग चांगलाच संतापलेला दिसत होता. तो म्हणाला की, 'चितगाव कसोटीपूर्वी त्याने सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम खेळ करत 5 विकेट घेतल्या होत्या. परदेशी भूमीवर तो नंबर वन फिरकीपटू असायला हवा होता पण त्याऐवजी त्याला पुढचा सामना खेळण्यासाठी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागली. दोन वर्षांनंतर संधी मिळूनही त्याला केवळ एका सामन्यानंतर काढून टाकण्यात आले. यामागील कारण जाणून घेतल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल.'

'अनेक खेळाडूंना 5 वर्षे संधी मिळाली, पण...'

हरभजन पुढे म्हणाला की, 'मला कोणत्याही खेळाडूचे नाव घ्यायचे नाही, पण कसोटी सामन्यांमध्ये काही खेळाडूंना बराच काळ संधी मिळाली, अनेक खेळाडूंना 5 वर्षांपर्यंत संधी दिली गेली. मात्र, कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) बाबतीत सुरक्षेचा कालावधी केवळ 15 दिवसांचा असल्याचे दिसून येत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel Air Strike: इस्रायलचं 'ऑपरेशन तेहरान'! महाभयंकर हवाई हल्ल्यात इस्लामिक जिहादच्या नेत्यांसह इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाला केलं टार्गेट

VIDEO: रोहितचा 'आसमानी' षटकार अन् स्वतःच मारली 'कॅच इट'ची हाक! हिटमॅनचा 'तो' व्हायरल व्हिडिओ पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ

Goa Unseasonal Rain: गुढीपाडव्याला वरुणराजा लावणार हजेरी! गोव्यात 18, 19 मार्चला 'यलो अलर्ट'; विजांच्या कडकडासह बरसणार सरी

Konkan Railway: 'कोकण रेल्वे' मार्गावर मान्सूनपूर्व तपासणी! मडगाव-ठोकूर, मडगाव-रोहा मार्गावर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! पगारात होणार 35 टक्क्यांची बंपर वाढ?8व्या वेतन आयोगाबाबत अर्थ मंत्रालयाने मागवल्या सूचना

SCROLL FOR NEXT