Jaydev Unadkat: भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अंतिम 11 जणांच्या संघात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ढाक्यात होत असलेल्या सामन्यात चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या जागेवर वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला संधी मिळाली आहे. त्यामुळे जयदेवच्या नावावर एक विक्रमही नोंदवला गेला आहे.
(Jaydev Unadkat comeback in Indian Test Team after 12 years)
जयदेवला 12 वर्षांनंतर संधी
जयदेवला अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळाली असल्याने तो आता तब्बल 12 वर्षांनी कसोटी सामना खेळत आहे. यापूर्वी त्याने 2010 साली कसोटी पदार्पण केले होते. त्याने 16 ते 20 डिसेंबर 2016 दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्यूरियनला त्याच्या कारकिर्दीतील पहिला सामना खेळला होता. मात्र या सामन्यात त्याला विकेट घेण्यात अपयश आलेले.
त्यानंतर त्याला आता तब्बल 12 वर्षांनी संधी मिळाली आहे. त्यामुळे एखाद्या खेळाडूच्या दोन सामन्यांच्या दरम्यान त्याच्या संघाने सर्वाधिक सामने खेळण्याच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आला. जयदेवच्या दोन कसोटी सामन्यांदरम्यान भारतीय संघाने 118 कसोटी सामने खेळले आहेत.
या यादीत अव्वल क्रमांकावर गॅरेथ बॅटी आहे. त्याने 2005 नंतर थेट 2016 साली कसोटी सामना खेळला होता. या दरम्यान इंग्लंडने तब्बल 142 कसोटी सामने खेळले होते. तसेच या यादीत तिसऱ्या क्रमांकावरही इंग्लंडचेच मार्टिन बिकनेल आहेत. त्यांनी 1993 नंतर 2003 मध्ये कसोटी सामना खेळला होता. यादरम्यान इंग्लंडने 114 कसोटी सामने खेळले.
जयदेवला मिळाली पहिली विकेट
दरम्यान, ढाक्यात होत असलेल्या कसोटी सामन्यात जयदेवने 12 वर्षांनंतर पुनरागमन करत पहिली कसोटी विकेटही घेतली आहे. त्याने बांगलादेशचा सलामीवीर झाकिर हसनला बाद करत त्याची पहिली कसोटी विकेट साजरी केली.
शमीच्या जागेवर संधी
जयदेवला दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागेवर बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात संधी मिळाली आहे. जयदेवने गेल्या काही महिन्यात सौराष्ट्र संघाचे नेतृत्व करताना वैयक्तिक कामगिरीही चांगली केली आहे. त्याचमुळे त्याचा पुन्हा एकदा भारतीय संघातील निवडीसाठी विचार करण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.