Nitish Rana Dainik Gomantak
क्रीडा

Nitish Rana Fined: अंपायरबरोबर वादानंतरही KKR कॅप्टनवर कारवाई! भरावे लागणार 24 लाख; टीमलाही दंड

चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणावर आणि संघावर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आली आहे.

Pranali Kodre

KKR Captain Nitish Rana Fined: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत 61 वा सामना रविवारी (14 मे) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला.

पण असे असले तरी कोलकाताचा कर्णधार नितीश राणाला या सामन्यानंतर बीसीसीआयने केलेल्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात कोलकाता संघाकडून षटकांची गती कमी राखल्याने म्हणजेच निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याने राणावर 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तसेच त्या सामन्यात खेळलेल्या कोलकाताच्या खेळाडूंनाही दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांना 6 लाखाचा किंवा सामना शुल्काच्या 25 टक्के, यातील जो कमी असेल तो दंड भरावा लागणार आहे. याबद्दल बीसीसीआयने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली आहे.

राणाने पंचांशी घातलेला वाद

या सामन्यात षटकांच्या गतीच्या नव्या नियमानुसार कोलकाताला पेनल्टीलाही सामोरे जावे लागले होते. त्यांना अखेरच्या षटकात केवळ चार क्षेत्ररक्षकच 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवता आले होते. या कारणामुळे नितीश राणाने पंचांशी वादही घातला होता.

आयपीएलच्या नव्या नियमानुसार संघांनी निर्धारित वेळत षटके टाकली नाहीत, तर उशीराने टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी संघांना कारवाई म्हणून केवळ चारच क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवता येणार आहेत.

दुसऱ्यांदा झाली चूक

दरम्यान, कोलकाता संघाकडून आयपीएल 2023 मध्ये कोलकाताकडून षटकांची गती कमी राखण्याची चूक दुसऱ्यांदा झाली आहे. यापूर्वी ईडन गार्डन्सवर झालेल्या पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातही कोलकाताकडून षटकांची गती कमी राखल्याबद्दल राणाला 12 लाखांच्या दंडाला सामोरे जावे लागले होते.

आता येऊ शकते बंदी

दरम्यान आयपीएलच्या नियमानुसार संघाकडून षटकांची गती कमी राखण्याची चूक तिसऱ्यांदा झाल्यास संघाच्या कर्णधारावर 30 लाखांचा दंड आणि एका सामन्याची बंदी अशी कारवाई केली जाते.

तसेच संघातील खेळाडूंवर 12 लाखांचा किंवा सामनाशुल्काच्या 50 टक्के, जी किंमत कमी असेल, तो दंड भरावा लागतो. हीच कारवाई नंतर प्रत्येक षटकांची गती कमी राखण्याच्या चूकीसाठी लागू होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT