ICC World Test Championship 2023-25 Cycle: रविवारी (11 जानेवारी) कसोटी चॅम्पियनशीपचे 2021-23 पर्व संपले. हे या स्पर्धेचे दुसरे पर्व होते. या पर्वाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विजेतेपद पटकावले. आता कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाला 16 जूनपासून सुरुवात होत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कसोटी चॅम्पियशीप 2023-25 पर्वाची घोषणा केली आहे. 16 जूनपासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू होणाऱ्या ऍशेस मालिकेपासून या पर्वाला सुरुवात होत आहे. या पर्वाचा अंतिम सामना 2025 मध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे.
या पर्वात साखळी फेरीत एकूण 27 मालिका आणि 68 सामने खेळवले जाणार आहेत. गेल्या दोन पर्वाप्रमाणेच या पर्वातही ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे 9 संघ सहभागी होणार आहेत.
या नऊ संघांना कसोटी चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वाच्या अंतर्गत मायदेशात 3 आणि परदेशात 3 अशा एकूण 6 कसोटी मालिका सहभागी 9 संघांपैकी 6 वेगवेगळ्या संघांविरुद्ध खेळाव्या लागणार आहेत. या मालिका 2 ते 5 सामन्यांच्या असू शकतात.
दरम्यान, या पर्वात कोणते संघ कोणाविरुद्ध मालिका खेळणार आहेत, हे देखील निश्चित झाले आहे. या पर्वात ऍशेसबरोबर भारत विरुद्ध इंग्लंड आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकाही 5 सामन्यांच्या असणार आहेत. 1992 नंतर पहिल्यांदाच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.
तिसऱ्या पर्वात इंग्लंड सर्वाधिक 21 सामने खेळणार आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारत प्रत्येकी 19 सामने खेळणार आहेत. तसेच जरी या स्पर्धेअंतर्गत संघ समान क्रमांकाचे सामने खेळणार नसले, तरी गुणतालिकेतील क्रमवारी ही विजयाच्या टक्केवारीनुसार ठरवली जाणार आहे.
या स्पर्धेअंतर्गत होणाऱ्या सामन्यांमध्ये प्रत्येक संघाला विजयी सामन्यासाठी 12 गुण दिले जातील. तसेच बरोबरीत सुटलेल्या सामन्यासाठी 6 गुण, अनिर्णित सामन्यासाठी 4 गुण दिले जातील. तर पराभूत संघाला एकही गुण मिळत नाही. तसेच षटकांची गती कमी राखल्याबद्दलही गुणांची कपात केली जाणार आहे.
असे विभाजन विजयी टक्केवारीबाबातही होणार आहे. संघाने सामन्यात विजय मिळवल्यास 100 टक्के, बरोबरीत सुटलेल्या सामन्यासाठी 50 टक्के, अनिर्णित सामन्यासाठी 33.33 टक्के आणि पराभूत सामन्याला 0 टक्के अशी विभागणी केली जाईल.
त्यानंतर गुणतालिकेत अव्व्ल दोन स्थान मिळवणाऱ्या संघांनां लॉर्ड्सवर 2025 मध्ये अंतिम सामना खेळता येणार आहे.
मायदेशात (विरुद्ध संघ) - भारत (5 सामने), वेस्ट इंडिज (2 सामने), पाकिस्तान (3 सामने)
परदेशात (विरुद्ध संघ) - न्यूझीलंड (2 सामने), इंग्लंड (5 सामने), श्रीलंका (2 सामने)
मायदेशात (विरुद्ध संघ) - न्यूझीलंड (2 सामने), दक्षिण आफ्रिका (2 सामने), श्रीलंका (2 सामने)
परदेशात (विरुद्ध संघ) - भारत (2 सामने), वेस्ट इंडिज (2 सामने), पाकिस्तान (2 सामने)
मायदेशात (विरुद्ध संघ) - ऑस्ट्रेलिया (5 सामने), वेस्ट इंडिज (3 सामने), श्रीलंका (2 सामने)
परदेशात (विरुद्ध संघ) - न्यूझीलंड (3 सामने), भारत (5 सामने), पाकिस्तान (3 सामने)
मायदेशात (विरुद्ध संघ) - न्यूझीलंड (3 सामने), इंग्लंड (5 सामने), बांगलादेश (2 सामने)
परदेशात (विरुद्ध संघ) - ऑस्ट्रेलिया (5 सामने), वेस्ट इंडिज (2 सामने), दक्षिण आफ्रिका (2 सामने)
मायदेशात (विरुद्ध संघ) - ऑस्ट्रेलिया (2 सामने), इंग्लंड (3 सामने), दक्षिण आफ्रिका (2 सामने)
परदेशात (विरुद्ध संघ) - भारत (3 सामने), बांगलादेश (2 सामने), श्रीलंका (2 सामने)
मायदेशात (विरुद्ध संघ) - इंग्लंड (3 सामने), वेस्ट इंडिज (2 सामने), बांगलादेश (2 सामने)
परदेशात (विरुद्ध संघ) - ऑस्ट्रेलिया (3 सामने), दक्षिण आफ्रिका (2 सामने), श्रीलंका (2 सामने)
मायदेशात (विरुद्ध संघ) - भारत (2 सामने), पाकिस्तान (2 सामने), श्रीलंका (2 सामने)
परदेशात (विरुद्ध संघ) -न्यूझीलंड (2 सामने), वेस्ट इंडिज (2 सामने), बांगलादेश (2 सामने)
मायदेशात (विरुद्ध संघ) - न्यूझीलंड (2 सामने), ऑस्ट्रेलिया (2 सामने), पाकिस्तान (2 सामने)
परदेशात (विरुद्ध संघ) - इंग्लंड (2 सामने), दक्षिण आफ्रिका (2 सामने), बांगलादेश (2 सामने)
मायदेशात (विरुद्ध संघ) - भारत (2 सामने), दक्षिण आफ्रिका (2 सामने), बांगलादेश (2 सामने)
परदेशात (विरुद्ध संघ) - ऑस्ट्रेलिया (2 सामने), इंग्लंड (3 सामने), पाकिस्तान (2 सामने)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.