KL Rahul Health Updates
KL Rahul Health Updates Twitter/klrahul
क्रीडा

जर्मनीत केएल राहुलची शस्त्रक्रिया यशस्वी, गर्लफ्रेंड अथियाने घेतली विशेष काळजी

दैनिक गोमन्तक

KL Rahul Health Updates: टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलने जर्मनीत शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आता परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचे त्याने सांगितले आहे. राहुलसोबत त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी जर्मनीमध्ये असून शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या तब्येतीची अथिया काळजी घेत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी राहुलला दुखापत झाली आणि संपूर्ण मालिकेतून तो बाहेर पडला. आता त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून संघात परतण्यासाठी तो सराव सुरू करणार आहे.

राहुलच्या मांडीला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेशिवाय संपूर्ण इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला होता. तो आता T20 विश्वचषकापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होऊन टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. राहुल सध्या संघातील सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे आणि तो ODI-T20 मध्ये संघाचा उपकर्णधारही आहे.

शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर चाहत्यांचे आभार मानले

राहुलने हॉस्पिटलमधील त्याचा फोटो शेअर केला आणि लिहिले, "गेले दोन आठवडे खूप कठीण गेले पण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मी बरा होत आहे. माझा पुनरागमनाचा प्रवास सुरू झाला आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, मला शुभेच्छा दिल्या त्या बद्दल सर्वांचे आभार, लवकरच भेटू."

आयपीएल 2022 मध्येही केएल राहूल सुपरहिट

राहुल हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे आणि या हंगामातही त्याची जबरदस्त खेळी बघायला मिळाली. आयपीएल 2022 मध्ये राहुलने तीन शतके झळकावली आणि आपल्या संघाला प्लेऑफमध्येही नेले, परंतु हा संघ एलिमिनेटर सामन्याच्या पुढे प्रगती करू शकला नाही. एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला आरसीबीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत राहुलला भारताचा कर्णधार बनवण्यात आले, पण मांडीला झालेल्या दुखापतीमुळे तो बाहेर पडला आणि ऋषभ पंतकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. राहुलने आतापर्यंत चार सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून सर्व सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway Fine Collection: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एप्रिलमध्ये 2.70 कोटी दंड वसूल

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

Madgaon Station News: कोकण रेल्वेची मडगाव येथे रेंट अ बाईक सुविधा; विजय सरदेसाईंचा कडाडून विरोध, आंदोलनाचा इशारा

आम्ही गप्प बसू शकत नाही...अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास कोर्टाची परवानगी

SCROLL FOR NEXT