IND vs IRE 2022: भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात चमकदार कामगिरी केली. भारतीय फलंदाजांनी 20 षटकात 227 धावा केल्या. भारतीय फलंदाज दीपक हुडाने (Deepak Hooda) जोरदार शतक झळकावले, त्याने 57 चेंडूत 104 धावा केल्या. त्याचवेळी संजू सॅमसनने 42 चेंडूत 77 धावा केल्या. दीपक हुडा आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांच्यात 176 धावांची शानदार भागीदारी झाली. भारताकडून केलेली ही सर्वोच्च भागीदारी आहे. (Highest T20 Partnership)
हुडा आणि सॅमसन यांच्यात विक्रमी भागीदारी
याआधी भारतासाठी सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या नावावर होता. केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिल्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली होती. हा सामना इंदूरमध्ये झाला होता. त्याचवेळी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या नावावर पहिल्या विकेटसाठी 160 धावांचा विक्रम आहे. या दोन्ही फलंदाजांनी 2018 साली आयर्लंडविरुद्ध हा विक्रम केला होता. भारत आणि आयर्लंड यांच्यातील हा सामना डब्लिन येथे खेळला गेला.
केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्या नावावर विक्रम होता
दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध 2017 मध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी 158 धावांची भागीदारी केली होती. हा सामना दिल्लीत खेळला गेला. आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर इशान किशन स्वस्तात बाद झाला, पण दीपक हुडा आणि संजू सॅमसनच्या शानदार खेळीमुळे भारतीय संघाने 227 धावांची मजल मारली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.