KL Rahul  Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 Final: केएल राहुलच्या नावावर मोठा विक्रम, वर्ल्ड कपमध्ये केली विशेष कामगिरी!

IND vs AUS: केएल राहुलने एक खास कामगिरी आपल्या नावावर केली. पण त्याच्या नावावर असलेली ही कामगिरी फलंदाजीत नाही तर यष्टिरक्षणात आहे.

Manish Jadhav

ODI World Cup 2023 IND vs AUS Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय विश्वचषक 2023 चा रोमांचक अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे लक्ष्य दिले. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 धावांची खेळी खेळली. या सामन्यात केएल राहुलने एक खास कामगिरी आपल्या नावावर केली. पण त्याच्या नावावर असलेली ही कामगिरी फलंदाजीत नाही तर यष्टिरक्षणात आहे.

दरम्यान, विश्वचषकाच्या एका आवृत्तीत विकेटच्या मागे सर्वाधिक झेल घेण्याचा किंवा यष्टीमागे सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केएल राहुलच्या (KL Rahul) नावावर आहे. केएल राहुलने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत विकेटच्या मागे 17 झेल घेतले.

विश्वचषकाच्या एका आवृत्तीत भारताकडून कोणत्याही यष्टिरक्षकाने बाद करण्याची ही सर्वाधिक संख्या आहे. मात्र, अंतिम सामन्यात केएल राहुलचे यष्टिरक्षण खूपच खराब राहिले आणि त्याने यष्टीमागे खूप धावा दिल्या.

दुसरीकडे, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पॅट कमिन्सचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. कारण या सामन्यात भारतीय संघाला जास्त धावा करता आल्या नाहीत. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया अवघ्या 240 धावा करु शकली आणि सर्वबाद झाली. या सामन्यात भारताकडून फलंदाजी करताना केएल राहुलने सर्वाधिक 66 धावांची खेळी खेळली.

याशिवाय, विराट कोहलीने 54 धावांची आणि कर्णधार रोहित शर्माने 47 धावांची खेळी खेळली. तर सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. मात्र, या सामन्यात गिल आणि अय्यर पूर्णपणे फ्लॉप ठरले. दोघांनी 4-4 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lionel Messi In India: 3 दिवस, 4 शहरं… मेस्सी भारत दौऱ्यावर! कधी, कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात उपस्थित राहणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

चोरीसाठी चोरट्याचा अजब जुगाड! सुपरमार्केटमध्ये पिशवी घेवून गेला अन्…. Viral Video एकदा बघाच

अग्रलेख: कष्टकऱ्यांचा आनंदोत्सव! ख्रिस्तीकरणानंतरही पूर्वकालीन संकेत विसरले नाहीत; गोमंतकीयांच्या भक्तीचा 'सांगडोत्सव'

SCROLL FOR NEXT