क्रीडा

IND vs AUS: केएल राहुलने का सोपवली सौराष्ट्राच्या 4 खेळाडूंकडे ट्रॉफी? कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक

Video: संघाचा भाग नसूनही मालिका विजयाची ट्रॉफी उचलण्याचा मान केएल राहुलने सौराष्ट्राच्या खेळाडूंना दिला.

Pranali Kodre

KL Rahul handed ODI Series Winning Trophy to local Saurashtra players:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच वनडे मालिका पार पडली. या मालिकेतील तिसरा सामना राजकोटला बुधवारी (27 सप्टेंबर) खेळवला गेला. या सामन्यात भारताला ६६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पण या मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकलेले असल्याने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

या मालिका विजयानंतर भारताचे कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी मन जिंकणारी कृती केली. या मालिकेतील विजय मिळवलेल्या पहिल्या दोन्ही सामन्यात भारताचे नेतृत्व रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलने केले होते, तर तिसऱ्या सामन्यात रोहितने पुनरागमन केले. त्यामुळे तिसऱ्या सामन्यानंतर मालिकाविजयाची ट्रॉफी दोघांनी मिळून स्विकारली.

दरम्यान, त्यानंतर विजयी संघाचा फोटो काढताना मात्र, रोहित आणि केएल राहुलने सौराष्ट्रमधील स्थानिक खेळाडूंचा दिवस अगदी स्पेशल बनवला. मालिका विजयाची ट्रॉफी केएल राहुलने सौराष्ट्राच्या चार खेळाडूंना दिली, ज्यांनी तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला ड्रिंक्स आणि क्षेत्ररक्षणासाठी मदत केली होती.

खरंतर झाले असे की तिसऱ्या सामन्यासाठी शुभमन गिलला विश्रांती देण्यात आली होती, तर मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर वैयक्तिक कारणामुळे घरी परतले होते.

त्याचबरोबर इशान किशनही आजारी होता, तर आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडू त्या तयारीसाठी घरी परतले होते. त्यामुळे भारताकडे प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यासाठी 13 खेळाडूंचाच पर्याय उपलब्ध होता. 

त्याचमुळे धरमेंद्र जडेजा, प्रेरक मंकड, विश्वराज जडेजा आणि हार्विक देसाई या स्थानिक खेळाडूंना संघाला ड्रिंक्ससाठी आणि क्षेत्ररक्षणात मदतीसाठी बोलवण्यात आले होते.

या खेळाडूंचा भारतीय संघात समावेश नव्हता, मात्र मदतीला म्हणून ते भारतीय ताफ्यात सामील झाले होते. त्यांनी खेळाडूंना मैदानात पाणी नेऊन देण्यासाठी आणि क्षेत्ररक्षणासाठी मदत केली.

त्याचे हे योगदान लक्षात घेत केएल राहुलने मालिका विजयाची ट्रॉफी संघाचा फोटो काढताना त्यांच्या हातात सोपवली. या कृतीने मात्र सर्वांची मने जिंकली आहेत.

दरम्यान, तिसऱ्या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास ऑस्ट्रेलियाने चार खेळाडूंच्या अर्धशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 352 धावा केल्या. तसेच त्यानंतर भारताचा संघ 353 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 49.4 षटकात 286 धावांवर सर्वबाद झाला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT