Khalid Jameel Dainik Gomantak
क्रीडा

खलिद जमील आयएसएलमधील पहिले भारतीय मुख्य प्रशिक्षक!

इंडियन सुपर लीग ( ISL) फुटबॉल स्पर्धेतील संघाचे मुख्य प्रशिक्षक बनणारे खलिद जमील (Khalid Jameel) हे पहिले भारतीय मार्गदर्शक ठरले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: इंडियन सुपर लीग ( ISL) फुटबॉल स्पर्धेतील संघाचे मुख्य प्रशिक्षक बनणारे खलिद जमील (Khalid Jameel) हे पहिले भारतीय मार्गदर्शक ठरले आहेत. गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेडने आगामी मोसमासाठी जमील यांच्याकडे संघाची सूत्रे सोपविली आहेत.

गतमोसमात (2020-21) जमील यांनी नॉर्थईस्ट युनायटेडचे हंगामी प्रशिक्षक या नात्याने जबाबदारी निभावली होती. गेरार्ड नूस यांनी यावर्षी जानेवारी गुवाहाटीच्या संघाचे प्रशिक्षकपद सोडल्यानंतर बाकी आयएसएल मोसमात सहाय्यक प्रशिक्षक असलेल्या जमील यांनी संघाला मार्गदर्शन केले होते. 44 वर्षीय जमील यांच्या मार्गदर्शनाखाली नॉर्थईस्ट युनायटेडने आयएसएल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले होते. जमील यांच्याकडे सूत्रे असताना नॉर्थईस्ट संघ सलग नऊ सामने अपराजित राहिला.

2021-22 मोसमासाठी जमील नॉर्थईस्ट युनायटेडचे पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक असतील. नव्या आयएसएल मोसमात जमील यांच्या मार्गदर्शखाली नॉर्थईस्ट युनायटेड संघ पहिला सामना येत्या 20 नोव्हेंबरला बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर बंगळूर एफसीविरुद्ध खेळेल. जमील जन्म कुवेतमध्ये झाला असून त्यांचे आई-वडील भारतीय आहेत. मध्यरक्षक या नात्याने खेळताना त्यांनी महिंद्र युनायटेड, एअर इंडिया, मुंबई एफसी या संघाचे क्लब पातळीवर, तर भारतातर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रतिनिधित्व केले. 2019-20 मोसमात नॉर्थईस्ट युनाटेडने त्यांची सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. त्यापूर्वी 2017 साली जमील यांच्या मार्गदर्शनाखाली ऐजॉल एफसीने आय-लीग विजेतेपद मिळविले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT