Kevin O Brien Dainik Gomantak
क्रीडा

Kevin O’Brien: World Cup मध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या खेळाडूने घेतली निवृत्ती

Kevin O’Brien Retirement: आयर्लंडचा विस्फोटक फलंदाज केविन ओब्रायनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

Kevin O’Brien Retirement: आयर्लंडचा विस्फोटक फलंदाज केविन ओब्रायनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने 2006 मध्ये आयर्लंडसाठी पहिला सामना खेळला होता. 16 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या. इंग्लंडविरुद्ध त्याने दोनदा शतक झळकावले. आयर्लंडसाठी पहिले कसोटी शतक झळकावण्याचा बहुमानही त्याच्या नावावर आहे. आयर्लंडला सहयोगी देशाकडून कसोटी खेळणाऱ्या देशाचा दर्जा मिळवून देण्यात केविन ओब्रायन याचाही मोठा वाटा आहे. त्याच्या नावावर अनेक खास रेकॉर्ड आहेत.

दरम्यान, केविन ओब्रायन (Kevin O Brien) हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये आयर्लंडकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 32.68 च्या सरासरीने आणि 5.20 च्या इकॉनॉमी रेटने एकूण 114 बळी घेतले. विश्वचषकात (World Cup) सर्वात जलद शतक झळकावणारा तो फलंदाजही ठरला आहे. 2011 च्या विश्वचषकात बंगळुरुच्या मैदानावर त्याने इंग्लंडविरुद्ध (England) तुफानी खेळी खेळली होती. यामध्ये त्याने अवघ्या 50 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. आयर्लंडने त्यावेळी हा सामना जिंकला होता. या खेळीत त्याने 13 चौकार आणि सहा षटकार मारले होते. त्याने 113 धावांची शानदार खेळी खेळली होती. मात्र, त्याचा संघ जिंकण्याआधीच तो धावबाद झाला. अखेरीस आयर्लंडने 328 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत सामना जिंकला.

आयर्लंडसाठी कसोटी शतक झळकावणारा पहिला खेळाडू

केविन ओब्रायन हा आयर्लंडमधील अशा खेळाडूंपैकी एक आहे, ज्याच्यामुळे आयर्लंडला कसोटी खेळण्याचा दर्जा मिळाला. 2017 मध्ये आयर्लंडला कसोटी खेळणाऱ्या राष्ट्राचा दर्जा मिळाल्यानंतर, केविन ओब्रायनने 2018 मध्ये पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) शतक झळकावले होते. आपल्या देशासाठी कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू होता. या सामन्याच्या पहिल्या डावात 40 धावा करुन तो बाद झाला. तर दुसऱ्या डावात त्यांचा संघ चार गडी गमावून 95 धावांवर झुंजत होता. त्यावेळी आयर्लंडला सामना जिंकण्यासाठी 85 धावांची गरज होती.

दुसरीकडे, केविन ओब्रायन यापूर्वी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला आहे. इटली आणि एस्टोनियासाठी त्याने ही जबाबदारी पार पाडली आहे. आता 38 वर्षांचा केविन आता प्रशिक्षक म्हणून चमत्कार करायला तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT