Kerala Blaster Dainik Gomantak
क्रीडा

केरळा ब्लास्टर्सची निसटती बाजी, ईस्ट बंगालला हरवून तिसऱ्या क्रमांकावर

निसटत्या विजयाचे पूर्ण तीन गुण महत्त्वाचे ठरले

दैनिक गोमन्तक

पणजी ः विश्रांतीनंतर चौथ्या मिनिटास नोंदविलेल्या सेटपिसेस गोलच्या बळावर केरळा ब्लास्टर्सने सोमवारी आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेत ईस्ट बंगालची झुंज निसटत्या फरकाने मोडून काढली. वास्को (Vasco) येथील टिळक मैदानावर केरळच्या संघाने 1-0 असा विजय नोंदवून गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळविले.

सामन्यातील निर्णायक गोल एनेस सिपोविच याने 49 व्या मिनिटास केला. केरळा ब्लास्टर्सचा हा 15 लढतीतील सातवा विजय ठरला. त्यांचे 26 गुण झाले व गुणतक्‍त्यांत एटीके मोहन बागानला गाठले. गोलसरासरीत एटीके मोहन बागान संघ +7 गोलसरासरीसह दुसऱ्या स्थानी राहिला, +6 गोलफरक असलेल्या केरळा ब्लास्टर्सला त्यांच्या खाली क्रम मिळाला. अव्वल स्थानावरील हैदराबाद एफसीचे 29 गुण आहेत.

मागील लढतीत जमशेदपूरकडून हार पत्करलेल्या केरळा ब्लास्टर्सला ईस्ट बंगालवर निर्विवाद वर्चस्व राखता आले नाही, पण निसटत्या विजयाचे पूर्ण तीन गुण महत्त्वाचे ठरले. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या ईस्ट बंगालला (Bengal) फक्त एका गोलच्या फरकाने सामना गमावल्याचे समाधान लाभले. त्यांचा 17 सामन्यातील हा नववा पराभव ठरला. त्यामुळे 10 गुणांसह ते दहाव्या स्थानी कायम राहिले.

बोस्निया हर्झेगोव्हिनाचा बचावपटू एनेस सिपोविच याने विश्रांतीनंतर चौथ्याच मिनिटास शानदार हेडिंग साधत केरळा ब्लास्टर्सला आघाडी मिळवून दिली. या 31 वर्षीय खेळाडूचा हा आयएसएल (ISL) स्पर्धेतील पहिलाच गोल ठरला. लाल्थाथांगा खॉल्हरिंग याच्या कॉर्नर फटक्यावर सिपोविच याने आपल्या उंचीचा सुरेखपणे लाभ उठविला, त्यामुळे ईस्ट बंगालच्या महंमद रफीकचे पहारा कुचकामी ठरला. सिपोविच योग्य उडी घेत चेंडूला व्यवस्थितपणे नेटची दिशा दाखविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT