Kerala Blasters dainik gomantak
क्रीडा

ISL : समदच्या गोलमुळे ‘केरळा’चे पारडे जड

ISL : उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यात जमशेदपूरवर निसटती मात

दैनिक गोमन्तक

पणजी: मध्यरक्षक सहल अब्दुल समद याने मोसमातील शानदार फॉर्म कायम राखताना पूर्वार्धात केलेल्या गोलमुळे आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यात केरळा ब्लास्टर्सचे पारडे जड झाले. शुक्रवारी त्यांनी लीग विनर्स शिल्ड विजेत्या जमशेदपूर एफसीवर 1-0 फरकाने मात केली. (Kerala Blasters defeated League Winners Shield winners Jamshedpur FC)

सामना फातोर्डा (Fatorda) येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर (Pandit Jawaharlal Nehru Stadium) झाला. पहिल्या टप्प्यात विजयी कामगिरी केल्यामुळे केरळा ब्लास्टर्सने (Kerala Blasters) आता एक पाऊल अंतिम फेरीत टाकले आहे. दुसऱ्या टप्प्यातील लढतीत त्यांना बरोबरीही पुरेशी ठरेल, तर जमशेदपूरला (Jamshedpur FC) पुढील लढत दोन गोलने जिंकावी लागेल. दुसऱ्या टप्प्यातील सामना 15 मार्च रोजी खेळला जाईल.

समदने 38व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे (goal) साखळी फेरीत सलग सात सामने जिंकलेल्या जमशेदपूरची घोडदौड खंडित झाली. स्पर्धेच्या साखळी फेरीत जमशेदपूरने केरळा ब्लास्टर्सचा 3-0 फरकाने धुव्वा उडविला होता, त्या पराभवाचा वचपा इव्हान व्हुकोमानोविच यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने काढला. केरळा ब्लास्टर्सने शुक्रवारी बचावफळीत पूर्ण एकाग्रतेने खेळ केला, त्यामुळे ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला आक्रमणात विशेष संधी मिळाली नाही. त्यांच्या आघाडीफळीत यशस्वी ठरलेल्या ग्रेग स्टुअर्ट व डॅनियल चिमा चुक्वू यांना रोखण्यात केरळा ब्लास्टर्सने यश मिळविले.

निर्णायक गोल

विश्रांतीला सात मिनिटे बाकी असताना जमशेदपूरच्या बचावपटूने चूक केल्यामुळे केरळा ब्लास्टर्सला सोपे ठरले. थ्रो-ईनवर चेंडू मिळाल्यानंतर अल्वारो व्हाझकेझ याने समद याला सुरेख पास दिला. यावेळी जमशेदपूरच्या रिकी लाल्लॉमॉमा याला हेडिंगद्वारे चेंडू दिशाहीन करता आला नाही, उलट त्याने समदचे काम आणखीनच सोपे केले. यावेळी जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेश याने जागा सोडणेही समदच्या पथ्यावर पडले. 24 वर्षीय मध्यरक्षकाने कल्पकता दाखवत गोलरक्षकाच्या (Goalkeeper) डोक्यावरून चेंडूला नेटची दिशा दाखविली. त्याचा हा मोसमातील सहावा गोल (goal) ठरला.

संधी हुकल्या

केरळा ब्लास्टर्सचा (Kerala Blasters) कर्णधार ॲड्रियन लुना याने संघाची आघाडी 59व्या मिनिटास जवळपास वाढविली होती, पण जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेश याने फ्रीकिकवरील फटका अतिशय चपळाईने नेटमध्ये जाण्यापासून रोखला. त्यानंतर सामन्यातील एक मिनिट बाकी असताना बदली खेळाडू ईशान पंडिता याच्या फटक्याच्या नेम चुकल्यामुळे जमशेदपूरला (Jamshedpur FC) बरोबरीपासून वंचित राहावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT