हैदराबादसमोर एटीके मोहन बागानचे कठीण आव्हान

आयएसएल फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दोन मातब्बर संघात लढत
ATK Mohan Bagan
ATK Mohan Bagandainik gomantak

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात हैदराबाद एफसीने साखळी फेरीत शानदार खेळ केला, पण आता उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यात त्यांच्यासाठी एटीके मोहन बागानचे आव्हान कठीणच असेल. सामना शनिवारी (ता. १२) बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर (Athletic Stadium) सामना होईल. (ATK Mohan Bagan's challenge in front of Hyderabad in ISL football tournament)

स्पर्धेत सलग १५ सामने अपराजित राहिलेल्या एटीके मोहन बागानला (ATK Mohan Bagan) अखेरच्या साखळी लढतीत जमशेदपूरविरुद्ध (Jamshedpur) एका गोलने हार पत्करावी लागली. त्यामुळे त्यांना तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले. हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील संघ प्ले-ऑफ लढतीसाठी नव्या तयारीने मैदानात उतरेल हे स्पष्ट आहे. साखळी फेरीत त्यांनी हैदराबादला नमविले होते, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला असेल.

ओगबेचेच्या तंदुरुस्तीकडे लक्ष

मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद एफसीने (Hyderabad) आयएसएलमध्ये (ISL) यंदा सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. साखळी फेरीत २० पैकी ११ सामने जिंकून ३८ गुणांसह दुसरा क्रमांक मिळविला. साखळी फेरीत जमशेदपूरकडून (Jamshedpur) ०-३ फरकाने हार पत्करल्यामुळे त्यांना लीन विनर्स शिल्डची संधी हुकली. नायजेरियन (Nigerian) बार्थोलोम्यू ओगबेचे हैदराबादचा प्रमुख खेळाडू आहे. १७ सामन्यांत १७ गोल नोंदवून तो गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर आहे. हैदराबादची उपांत्य फेरी निश्चित झाल्यानंकर साखळी फेरीतील मागील दोन लढतीत ओगबेचे आजारपणामुळे खेळू शकला नव्हता.

‘‘आम्ही सावरलो असून आता सज्ज आहोत. खेळाडूंच्या तंदुरुस्तीच्या बाबतीत कोणतीच घाई करू इच्छित नाही आणि त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेऊन राहू,'' असे मार्केझ यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘आम्ही प्रथमच उपांत्य फेरीत धडक मारलीय, ही सर्वांत चांगली गोष्ट आहे. आम्हाला आणखी चांगला खेळ करायला हवा.’’

ATK Mohan Bagan
I-League Football Tournament: चर्चिल ब्रदर्स विजयाच्या प्रतीक्षेत

लिस्टन, मनवीरचा दबदबा

एटीके मोहन बागानला हुआन फेरांडो यांनी नवसंजीवनी दिली. अंतोनियो लोपेझ हबास यांच्याकडून फेरांडो यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर संघाने १४ सामन्यांत फक्त एकच पराभव पत्करला आणि गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. त्यांच्या लिस्टन कुलासो आणि मनवीर सिंग यांनी मोसमात दबदबा राखताना एकत्रित १४ गोल केले, त्यापैकी आठ गोल एकट्या लिस्टनचे आहेत. रॉय कृष्णा व डेव्हिड विल्यम्स हे त्यांचे तरबेज खेळाडू आहेत.

‘‘स्पर्धेतील खूपच चांगल्या संघाशी आमची लढत आहे. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. त्यांना पराभूत करणे सोपं नक्कीच नाही. चेंडूवर ताबा राखणे, संधी निर्माण करणे आणि मग आक्रमण करणे, हेच आमचे नियोजन आहे,’’ असे फेरांडो म्हणाले. ओगबेचे याला रोखण्यासाठी आमच्याकडे खास रणनीती असल्याचे त्यांनी नमूद केले.

दृष्टिक्षेपात...

- साखळी फेरीत हैदराबादचे ४३, तर एटीके मोहन बागानचे ३७ गोल

- हैदराबादने (Hyderabad) २३ गोल, तर एटीके मोहन बागानने (ATK Mohan Bagan) २६ गोल स्वीकारले

- साखळी फेरीतील पहिल्या टप्प्यात उभय संघात २-२ गोलबरोबरी

- दुसऱ्या टप्प्यातील लढतीत एटीके मोहन बागानची हैदराबादवर २-१ फरकाने मात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com