पणजी : केरळा ब्लास्टर्सने गतविजेत्या मुंबई सिटीला पराभवाचा जोरदार धक्का देताना आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीचा दावा कायम राखला. स्पॅनिश आघाडीपटू अल्वारो व्हाझकेझ याच्या दोन गोलच्या बळावर केरळच्या संघाने 3-1 असा चमकदार विजय नोंदविला. (Kerala Blasters claim semifinals in ISL)
सामना बुधवारी वास्को (Vasco) येथील टिळक मैदानावर (Tilak Maidan) झाला. केरळा ब्लास्टर्सचा हा 19 लढतीतील नववा विजय ठरला. त्यांचे आता 33 गुण झाले असून मुंबई सिटीस मागे टाकून ते चौथ्या स्थानी आले आहेत. सहाव्या पराभवामुळे मुंबई सिटीचे 19 लढतीनंतर 31 गुण कायम राहिले व त्यांना पाचव्या क्रमांकावर घसरावे लागले. दोन्ही संघांसाठी साखळी फेरीतील शेवटचा सामना महत्त्वाचा असेल. पाच मार्च रोजी मुंबई सिटी हैदराबाद एफसीविरुद्ध (Hyderabad FC) खेळेल, सहा मार्च रोजी केरळा ब्लास्टर्सचा सामना एफसी गोवाविरुद्ध खेळेल. मुंबई सिटी (Mumbai City), तसेच केरळा ब्लास्टर्सला मोहिमेतील अखेरच्या लढतीत विजय अत्यावश्यक असेल. सध्या जमशेदपूर (37 गुण) व हैदराबाद (35 गुण) या संघांनी प्ले-ऑफ फेरी निश्चित केली असून एटीके मोहन बागानला (34 गुण) फक्त एका गुणाची गरज आहे.
केरळा (Kerala) ब्लास्टर्सच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या तीस वर्षीय अल्वारो याने पहिला गोल पेनल्टी फटक्यावर 45+1व्या मिनिटास नोंदविला, त्याला मुंबई सिटीच्या मुर्तदा फॉल याने गोलक्षेत्रात पाडले होते. नंतर 60व्या मिनिटास अल्वारोने प्रतिस्पर्धी गोलरक्षक महंमद नवाझ जाग्यावर नसल्याची संधी साधत मोसमातील वैयक्तिक सातवा गोल केला. यावेळी नवाझच्याच चुकीच्या किकवर अल्वारो याने चेंडूवर ताबा मिळविला होता. त्यापूर्वी, 19व्या मिनिटास सहल समद याने ड्रिबलिंगचे अफलातून कौशल्य प्रदर्शित करत केरळा ब्लास्टर्सला आघाडी मिळवून दिली होती. बदली ब्राझीलियन (Brazil)खेळाडू दिएगो मॉरिसियो याने 71व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर मुंबई सिटीची (Mumbai City) पिछाडी एका गोलने कमी केली.
गतमोसमातील आयएसएल (ISL) स्पर्धेत दहाव्या स्थानी घसरण झालेल्या केरळा (Kerala) ब्लास्टर्सने यंदा इव्हान व्हुकोमानोविच यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेख खेळ करत आता चौथा क्रमांकापर्यंत प्रगती साधली. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही त्यांनी मुंबई सिटीचा (Mumbai City) 3-0 फरकाने धुव्वा उडविला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.