फातोर्डा : सालसेत तालुका बुद्धिबळ असोसिएशनाची कार्यकारिणी (Executive of the Chess Association) समिती निवडण्यासाठी सद्या दोन गटांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तथा गोवा बुद्धिबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष आशेश केणी (Ashesh Keni) व मडगावच्या उपनगराध्यक्ष दिपाली सावळ (Deepali Saval) यांचे पती दिगंबर सावळ (Digambar Saval) असे दोन गट एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत.
ही निवडणुक 27 जून रोजी होणार होती पण कोविड परिस्थिती तसेच राज्यात लागू केलेला कर्फ्यू व 144 कलम यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही निवडणुक घेण्यास प्रतिबंध केला. आता असोसिएशनचे सचिव दामोदर जांबावलीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून 4 जुलै रोजी निवडणुक घेण्यासाठी मान्यता देण्याची विनंती केली आहे. सरकारनेही आता काही नियम शिथिल केल्याने निवडणुकीच मान्यता मिळेल असा विश्वास जांबावलीकर यानी या प्रतिनिधिकडे व्यक्त केला.
केणी गटामध्ये स्वता आशेश केणी अध्यक्षपदासाठी तर दामोदर जांबावलीकर उपाध्यक्षपदासाठी, निलेश शिरोडकर सचिवपदासाठी पृथ्विराज कातकर संयुक्त सचिवपदासाठी तर डॉ. शैलजा परब, ज्योत्सना सारिपल्ली, अरुण कुमार व डॉ. एडगर हे सदस्यपदासाठी निवडणुक लढविणार आहेत. त्यांच्याच गटातील दिलीप वेर्णेकर याची खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली आहे. सावळ गटात अध्यक्षपदासाठी स्वता दिगंबर सावळ, उपाध्यक्षपदासाठी नविता च्यारी, सचिवपदासाठी सुनील बाळ्ळीकर ही मंडळी निवडणुक लढविणार आहेत.
सद्या असोसिएशनचे 49 सदस्य व 7 क्लब मिळुन एकुण 56 मते आहेत. केणी गटातील सर्वच जणांना बुद्धिबळ खेळाचा तसेच या खेळाच्या प्रशासन कार्याचा चांगला परिचय व अनुभव आहे. शिवाय आपल्या गटाला 35 ते 40 सदस्यांचा पाठिंबा असल्याने आमचाच गट निवडुन येईल असा विश्र्वास जांबावलीकर यांनी व्यक्त केला.
सालसेत तालुका बुद्धिबळ असोसिएशन हा गोवा बुद्धिबळ असोसिएशनचा सर्वांत शिस्तबद्ध, क्रियाशील असोसिएशन असुन वर्षाकाठी चार ते पाच स्पर्धा आयोजित केल्या जातात शिवाय प्रशिक्षण वर्ग, कार्यशाळांचे नियमित आयोजन होत असते असे जांबावलीकर यांनी सांगितले. सालसेत तालुका बुद्धिबळ असोसिएशनची कचेरी स्थापण्यासाठी गोवा क्रिडा प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार व बोलणी चालु असुन फातोर्डा येथील नेहरु स्टेडियम क्रिडा संकुलात कचेरीसाठी जागा मिळेल असा विश्र्वासही जांबावलीकर यांनी व्यक्त केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.