Kane Williamson Rachin Ravindra
Kane Williamson Rachin Ravindra X/ICC
क्रीडा

NZ vs SA: विलियम्सन-रचिनचा शतकी दणका! एकाने ब्रॅडमन-कोहलीला पछाडलं, तर दुसऱ्यानं ठोकली पहिलीच सेंच्युरी

Pranali Kodre

New Zealand vs South Africa, 1st Test, Kane Williamson Rachin Ravindra Century:

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात रविवारी (4 फेब्रुवारी) कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना माउंट मौनगानुई येथे सुरू आहे. या सामन्याचा पहिलाच दिवस न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्सन आणि युवा क्रिकेटपटू रचिन रविंद्र यांनी शतके करत गाजवला.

या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडने डेवॉन कॉनवे आणि टॉम लॅथम या सलामीवीराच्या विकेट्स झटपट गमावल्या होत्या. पण नंतर केन विलियम्सन आणि रचिन रविंद्र यांची जोडी जमली. या दोघांनी नंतर पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला मोठे यश मिळू दिले नाही.

दोघांनीही वैयक्तिक शतके झळकावली. तसेच त्यांच्यात पहिल्या दिवसाखेरपर्यंत 219 धावांची नाबाद भागीदारीही झाली. विलियम्सन ११२ धावांवर, तर रचिन रविंद्र 118 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे पहिल्या दिवसाखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात 86 षटकात 2 बाद 258 धावा केल्या.

दरम्यान, रचिनचे पहिलेच कसोटी शतक आहे, तर विलियम्सनचे 30 वे कसोटी शतक आहे. त्यामुळे विलियम्सन आता सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 13 व्या क्रमांकावर आला आहे.

तसेच त्याने डॉन ब्रॅडमन आणि विराट कोहली यांना या यादीत मागे टाकले आहे. ब्रॅडमन आणि कोहली यांनी कसोटीत प्रत्येकी 29 शतके केली आहेत.

त्याबरोबर या यादीत विलियम्सनने मॅथ्यू हेडन, जो रुट आणि शिवनारायण चंद्रपॉल यांची बरोबरी केली आहे. हेडन, रुट आणि चंद्रपॉल यांनीही प्रत्येकी 30 कसोटी शतके केली आहेत.

त्याचबरोबर सध्या सक्रिय असणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये फक्त स्टीव्ह स्मिथने विलियम्सनपेक्षा अधिक शतके केली आहेत. स्मिथने 32 शतके केली आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे विलियम्सन कसोटीत 30 शतके करणारा न्यूझीलंडचा पहिलाच क्रिकेटपटू आहे. त्याच्यानंतर न्यूझीलंडकडून सर्वाधिक कसोटी शतके रॉस टेलरने केली आहेत. टेलरने 19 शतके कसोटीत केली आहेत.

विलियम्सनने कसोटीत 55 पेक्षा अधिकच्या सरासरीने 8000 हून अधिक धावा केल्या आहेत. तो कसोटीत 8000 धावांचा टप्पा पार करणाराही न्यूझीलंडचा एकमेव फलंदाज आहे.

विलियम्सन - रचिनची विक्रमी भागीदारी

विलियम्सन आणि रचिनने केलेली नाबाद 219 धावांची भागीदारीही विक्रमी ठरली आहे. न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत द्विशतकी भागीदारी करणारी त्यांची तिसरीच जोडी ठरली आहे.

यापूर्वी स्टीफन फ्लेमिंग आणि जेम्स फ्रँकलिन यांनी केपटाऊन कसोटीत 2006 साली 256 धावांची भागीदारी केली होती. तसेच ख्रिस क्रेन आणि जेकॉब ओरम यांनी 2004 साली ऑकलंडला झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत 225 धावांची भागीदारी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT