Kane Richardson Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs AUS: केन रिचर्डसन पाकिस्तान दौऱ्यातून आऊट!

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघांच्या अडचणी वाढल्या आहेत. केन रिचर्डसनला या मालिकेतून वगळल्याने त्यांची अडचण वाढली आहे. वास्तविक, पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलिया आता ज्या वेगवान आक्रमणासह उतरणार होता तो आता उतरु शकणार नाही. पाकिस्तान (Pakistan) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील वनडे मालिका 29 मार्चपासून सुरु होत आहे. 3 वनडे मालिकेतील सर्व सामने लाहोरमध्ये खेळवले जातील. (Kane Richardson to miss ODI series against Pakistan due to hamstring injury)

दरम्यान, केन रिचर्डसनला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असून, त्यामुळे त्याला या मालिकेतून बाहेर व्हावे लागले आहे. सोमवारी मेलबर्नमध्ये सराव करताना रिचर्डसनला दुखापत झाली होती. त्याच्या जागी डावखुरा गोलंदाज बेन द्वारशुइसचा वनडे आणि टी-20 मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघाची स्थिती

पाकिस्तानविरुद्धचा शेवटचा कसोटी सामना संपताच मिचेल स्टार्क, जोस हेझलवूड आणि पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाला परततील. अशा स्थितीत केन रिचर्डसन हा एकमेव ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज संघात राहीला होता. परंतु आता तो ही दुखापतीमुळे संघातून आऊट झाला आहे. जेसन बेहरेनडॉर्फकडे 11 एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे. त्याचबरोबर सेन अ‍ॅबॉटने आतापर्यंत 2 वनडे सामने खेळले आहेत. नॅथन एलिस आणि द्वारशुईस यांना अद्याप पदार्पण करायचे आहे.

मात्र, एकदिवसीय मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या फिरकी आक्रमणात कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. संघात अ‍ॅडम झम्पा असणार आहे, ज्याला 61 वनडे खेळण्याचा अनुभव आहे. तर अ‍ॅस्टन आगरला 15 वनडे खेळण्याचा अनुभव आहे.

फिंचचा आत्मविश्वास

मात्र ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला पूर्ण आशा आहे की, 'अधिकाधिक टी-20 सामने खेळण्याचा फायदा गोलंदाजांना मिळेल. बेहरेनडॉर्फ, अ‍ॅबॉट आणि एलिस यांना 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. याशिवाय त्यांना आयपीएलचा अनुभवही आहे.' त्याच वेळी, द्वारशुसला देशांतर्गत क्रिकेटमध्ये 100 हून अधिक टी-20 सामने खेळण्याचा अनुभव आहे. फिंचच्या मते, 'या खेळाडूंना त्यांच्या अनुभवाचा फायदा पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत पाहायला मिळेल.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT