Kagiso Rabada Dainik Gomantak
क्रीडा

Kagiso Rabada: गर्लफ्रेंडच्या वडिलांना हिंदीतून Imprece करतोय दक्षिण आफ्रिकेचा घातक गोलंदाज

South Africa Fast Bowler: दक्षिण आफ्रिकेचा घातक गोलंदाज कागिसो रबाडा त्याच्या किलर गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे.

दैनिक गोमन्तक

Kagiso Rabada Viral Video: दक्षिण आफ्रिकेचा घातक गोलंदाज कागिसो रबाडा त्याच्या किलर गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएल 2022 मध्ये तो पंजाब किंग्जकडून खेळला होता. परदेशी खेळाडू जेव्हा आयपीएलमध्ये खेळतात तेव्हा ते भारतीय खेळाडूंशी हिंदीत संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. पण आता दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज रबाडा हिंदी बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रबाडाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे

कागिसो रबाडा (Kagiso Rabada) भारतीय रेडिओ जॉकी करिश्मासोबत हिंदीत बोलताना दिसला. यादरम्यान ती रबाडाला भारतीय पालकांना कसे प्रभावित करायचे ते सांगते. यामध्ये तिने काही शब्द चुकीचे सांगितले आहेत. एकदा तो 'धन्य झाले हो' यास तो 'धनिया' म्हणतो, त्याचवेळी तो 'नमस्ते सासरे बुवा' हे वाक्य चुकीच्या पध्दतीने उच्चारताना दिसतो. हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

धोकादायक गोलंदाजी तज्ञ

कागिसो रबाडा हा त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी (South Africa) अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. जेव्हा तो आपल्या लयीत असतो, तेव्हा तो फलंदाजांवर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून तुटून पडतो. डावाच्या सुरुवातीला तो खूपच धोकादायक असल्याचे सिद्ध होते. रबाडा दक्षिण आफ्रिकेकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे.

डावाच्या सुरुवातीला धोकादायक ठरतो

कागिसो रबाडाने दक्षिण आफ्रिकेकडून 55 कसोटी सामन्यात 257 विकेट्स, 87 एकदिवसीय सामन्यात 135 बळी आणि 49 टी-20 सामन्यात 55 बळी घेतले आहेत. तो त्याच्या वेगासाठी प्रसिद्ध आहे आणि तो खूप किफायतशीर असल्याचे सिद्ध होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Teachers Recruitment: गोव्यात NEP ची होणार प्रभावी अंमलबजावणी! शाळांमध्ये 1008 शिक्षक, 377 इन्स्ट्रक्टर्सची होणार भरती

Goa Nightclub Fire: थंडीत लुथरा बंधूंनी फरशीवर तळमळत काढली रात्र, बर्च बाय रोमियो लेन क्लबच्या मालकांनी कोठडीत केला देवाचा धावा

Goa Liberation Day: नेहरूंनी दिलेला 'तो' एक आदेश अन् गोवा झाला मुक्त; वाचा 36 तासांच्या धडाकेबाज मोहिमेचा थरार

Horoscope: ग्रहांची शुभ स्थिती! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Syed Mushtaq Ali Trophy 2025: ईशान किशनचं वादळ अन् झारखंडचा ऐतिहासिक विजय; फायनलमध्ये हरियाणाचा धुव्वा उडवत पटकावलं विजेतेपद! VIDEO

SCROLL FOR NEXT